मुंबई : मुंबईत आगीच्या घटना (Mumbai fire) थांबायचे काही नाव घेत नाही. मागील काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या वारंवार घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी करीरोड, ताडदेव (Curey road and Tardeo) येथे आगीच्या घटना ताज्या असताना, आज पुन्हा एकदा अंधेरी येथे भीषण आग लागली आहे. चित्रकूट मैदानातील सिनेमाच्या एका सेटला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. फन रिपब्लिक सिनेमा असं नाव आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अंधेरीत चित्रकूट मैदानाजवळ भीषण आग लागली आहे. (Andheri fire chitrkut ground)
[read_also content=”ठरलं! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘असा असणार’ मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला https://www.navarashtra.com/maharashtra/after-shinde-shah-meeting-cabinet-ministers-formula-next-two-three-days-will-be-done-309457.html”]
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग किती लेव्हलची आहे, याची माहिती समोरी आली नाही, तसेच आग कोणत्या कारणामुळं लागली याची सुद्धा माहिती समोर आली नाही. मात्र सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.