मुंबईतला (Mumbai) भिंडी बाजार देशातल्या सगळ्यात जुन्या बाजारांपैकी एक आहे. या बाजारात लोकांना आवश्यक त्या सगळ्या वस्तू मिळत असल्याने अनेक जण इथे आवर्जून भेट देतात. हा बाजार स्थानिक खाद्यपदार्थ, अँटीक वस्तू आणि अनेक सांस्कृतिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला फोन, चामड्याच्या वस्तू, कपडे आणि धार्मिक कलाकृतींपासून हार्डवेअरपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. भिंडी बाजारातील (Bhindi Bazaar Speciality) रौदत ताहेरा आणि सैफी मशिदीला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात. (Bhendi Bazaar History)
भिंडी बाजारचा इतिहास
भिंडी बाजारचा इतिहास मुंबई शहराशी खूप पूर्वीपासून जोडला गेलेला आहे. या बाजाराने मुंबईला महानगर बनवण्याच महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. या जागेवर सगळ्यात आधी बंदरावर काम करणाऱ्यांसाठी घरं बांधली गेली होती. क्रॉफर्ड बाजार जवळ असल्याने व्यापारी आसपासच्या क्षेत्रामध्ये राहण्यासाठी उत्सुक होते.
खरंतर, भिंडी बाजार ‘बिहाइंड द बाजार (Behind the Bazaar)’ चा स्थानिक उच्चार आहे. दाऊदी बोहरा, मेमन, गुजराती, सिंधी, पारसी, कच्छी आणि इतर समाजाच्या व्यापाऱ्यांना इथे व्यवसायाची संधी मिळाली. भिंडी बाजारात हार्डवेअर, फोम, कपडे आणि प्राचीन वस्तू त्यांनी विकायला सुरुवात केली. भिंडी बाजार आणि आसपासचे स्थानिक बाजार विशेषत: चोर बाजारात मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी आणि एक्स्चेंज करण्यासाठी संपूर्ण शहरातून लोक येत असतात.
[read_also content=”अतिक अन् अश्रफचे मारेकरी लॉरेन्स बिश्नोईचे चाहते, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/india/fans-of-atiq-and-ashrafs-killer-lawrence-bishnoi-shocking-revelations-in-police-investigation-nrdm-386792.html”]
बाजाराच्या रिडेव्हलपमेंटवर देण्यात येतोय भर
भिंडी बाजाराला एक उत्कृष्ट बाजार बनवण्यासाठी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (SBUT)) एका प्रोजेक्ट अंतर्गत रिडेव्हलपमेंटसाठी आग्रही आहे. ट्रस्ट या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानिक लोक आणि व्यापाऱ्यांचा व्यापार आणि निवास अशा दोन्ही दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा विचार करत आहे. या महत्वाकांक्षी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये 16.5 एकर जमीन, 250 पेक्षा जास्त बिल्डींग, 3200 कुटुंब आणि 1,250 दुकानांचा समावेश आहे. एका विकास कार्यक्रमांतर्गत इथे सगळ्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. धार्मिक स्थळांचाही यात विचार केला जाणार आहे.
खाद्यभ्रमंती
भिंडी बाजारमध्ये सगळ्यात लोकप्रिय मिठाईचं दुकान आहे मोय्यद मिठाईवाल्याचं शब्बीर तवक्कल मिठाई. जिलबी आणि अफलातूनसाठी हे प्रसिद्ध आहे. भारतात कोणतीही पार्टी मिठाईशिवाय पूर्ण होत नाही. भारतीय कुटुंबांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय आहे. तुम्ही मिठाईचे शौकीन असाल तर शब्बीर तवक्कल स्वीट्समध्ये नक्की जायला हवं. इथे तुम्हाला वेगवेगळ्या मिठाईचे प्रकार खायला मिळतील.
फखरुद्दीन मिठाईवालाचं फखरी फरसान मार्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना ताजं आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा असते. इथे अनेक खाद्यपदार्थ तुम्हाला कायला मिळतात. इथे कचोरी, खाखरा,वेफर्स, चिवडा आणि शेव इत्यादी सगळं काही उत्तम दर्जाचं असतं. भिंडी बाजारच्या सगळ्यात मोठ्या दुकांनांपैकी हे एक आहे.
आमिर आइस्क्रीमवालाचं आइस्क्रीम प्रसिद्ध आहे. हे भिंडी बाजाराच्या सगळ्यात प्रसिद्ध दुकानांपैकी एक आहे. हाताने इथे आइसक्रीम बनवलं जातं. त्याची चव तर उत्तम असतेच शिवाय ते मलाईदार असतं.






