मुंबई-कोल्हापूर-कागल शिरवळमध्ये एसटी बस खराब झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
शिरवळ : जीवन सोनवणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसला आहे. मुंबईहून कोल्हापूर-कागलकडे जाणारी एसटी बस (एमएच ४० एचक्यू ६३०५) शिरवळ येथे अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना बसला धक्का देत ती सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बस मुंबईहून कोल्हापूरमार्गे कागलकडे निघाली होती. मात्र, शिरवळ येथे अचानक बसचे इंजिन बंद पडल्याने ती रस्त्यातच थांबली. अनेक प्रयत्न करूनही बस सुरू न झाल्याने चालक-वाहकाने प्रवाशांना मदतीसाठी हातभार लावण्याची विनंती केली. शेवटी प्रवाशांनीच एकत्र येऊन बसला धक्का देण्यास सुरुवात केली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर बस सुरू झाली, मात्र या प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
एसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे बंद पडतात. नियमित मेंटेनन्स न झाल्यामुळे रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. एसटीच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रवाशांनी बसला धक्का देतानाचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी एसटी प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रवाशांना बसलेला मनस्ताप लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.या घटनेनंतर एसटी प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, बससेवेची अवस्था सुधारावी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
शिरवळ एमआयडीसी परिसरात जुन्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बुधवारी (दि.12) रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. अमर शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात तेजस महेंद्र निगडे (वय 19, रा. गुनंद, ता. भोर, जि. पुणे) याच्यावर हत्या केल्याचा संशय असून, त्याने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमर आणि तेजस यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग तेजसच्या मनात कायम राहिला. याच वैमनस्यातून त्याने अमरवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी अमरला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.