शेतकऱ्यांनो, पाऊस लांबतोय...! पेरण्यांची घाई करू नका; 'या' तारखेनंतर वाढणार पावसाची गती... (फोटो - istock)
मुंबई : महाराष्ट्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आधी आलेला जोरदार अवकाळी पाऊस आणि त्यानंतर 10 दिवस आधीच मान्सूनचे आगमन यामुळे राज्यावर पावसाळी संकट उभे राहिले आहे. राजधानी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये वरुणराजाने जोरदार आगमन केले. मात्र एकाच रात्रीमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईमधील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिला आहे. सोमवारी (दि.26) राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. तसेच ऊन पडल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाच ते सहा दिवसांनंतर सुर्याचे दर्शन पुण्यामध्ये बघायला मिळाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला यलो अलर्ट दिला आहे. तसेच नाशिकला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रामध्ये तीन ते चार दिवसांमध्ये तुफान पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे काल (दि.25) पश्चिम महाराष्ट्रासह तळ कोकण आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
यंदा मोसमी पाऊस अंदाजित वेळेपूर्वीच तळकोकणात दाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला आहे. रविवारी मोसमी पावसाने तळकोकणातील देवगडमध्ये मुसंडी मारली आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अधिक वेगात सुरू आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, अशा अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाला आणि मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही, असं होणं कठीणच आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कोलमडली आहे. मुंबई लोकल ट्रेन उशीराने धावत आहे. ठाणे ते कल्याण डाऊन आणि अप मार्गावरील लोकलसेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. शिवाय कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
बारामतीमध्ये एका रात्रीमध्ये पावसाने तुफान हजेरी लावली. महाराष्ट्रातील बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती शहरातील नीरा डावा कालवा फुटल्यामुळे पाणी प्रचंड वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद करण्यात आला. या भागातील दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं असून, अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल तातडीने बारामती गाठली.