मुंबई : बहुचर्चित एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच नाव आलं होतं. या प्रकरणी काल दादर पोलिसांकडुन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटं चौकशी झाली आहे. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
[read_also content=”राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२२; आज ‘या’ राशींच्या लोकांना आरोग्याबाबत अधिक सतर्क रहावे लागणार https://www.navarashtra.com/lifestyle/horoscope-28-october-2022-today-the-people-of-this-zodiac-sign-will-have-to-be-more-alert-about-their-health-339883.html”]
एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. मात्र, या प्रकरणी काही लोकांची चौकशी केली असता दोन किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर आलं होतं. एसआरए घोटाळा प्रकरणी जून महिन्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती, पण एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव नव्हतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती, यामध्ये किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे. तर एक मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे. यातल्या दोघांनी स्टेटमेंटमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं.
[read_also content=”कोविडमध्ये ठाकरे सरकारचा घरूनच राज्यकारभार, श्रीकांत शिंदेंची टीका https://www.navarashtra.com/maharashtra/mp-shrikant-shindes-criticism-said-opponents-only-visited-the-dam-for-20-minutes-for-photo-session-339874.html”]