Photo Credit- Social Media महायुतीच्या बैठकांना अनुपस्थिती, एकनाथ शिंदेंना नेमकं झालंय काय
मुंबई: राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे महायुतीपासून काहीसे दूर जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहण्याचा सिलसिला सुरू केला आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत तर्क-वितर्क वाढले आहेत. इतकेच नव्हे तर, ते महायुतीच्या कोणत्याही सभेतही दिसत नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी, पालकमंत्री पदांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाल्याने शिवसेनेची अस्वस्थता अधिकच वाढली आहे. या घडामोडी महायुतीतील समीकरणांवर परिणाम करण्याची शक्यता असल्याने शिंदे गटातील नाराजी अधिक तीव्र झाली आहे.
विकतचे कशाला घरीच सोप्या पद्धतीने बनवा Chilli Cheese Noodles, फार सोपी आहे रेसिपी
दुसरीकडे, राज्यात लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार जिल्हानिहाय बैठका घेत आहेत. या बैठका संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. मात्र, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नसल्याने या भागातील बैठका होऊ शकल्या नाहीत. या मुद्द्यावरून देखील शिवसेनेच्या असमाधानात वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा आता आणखी जोर धरू लागल्या आहेत. ते मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही, नियोजित बैठकींना हजेरी लावू शकत नसल्याचा संदेश देण्यात आला, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी या जिल्ह्यांच्या बैठकांना पुढे ढकलले आहे.
Ranji Trophy मध्ये अजिंक्य रहाणेचा कहर, झळकावलं आणखी एक शतक, पुन्हा एकदा
शिंदे बैठकींना का अनुपस्थित राहिले, याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकींना पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर, गेल्या आठवड्यात ते वाॅर रूमच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तसेच, त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या असंतोषाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. रायगडसाठी मंत्री आदिती तटकरे आणि नाशिकसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. या जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नसल्याने आज (मंगळवारी) रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या बैठकीचे नेतृत्व विभागीय आयुक्त करतील. तसेच, मुंबई शहर, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठीही आज बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.