मुंबई : अर्थसंकल्पीय अधिनेशनाचा दुसरा आठवड्यातही आज विरोधक अनेक मुद्यावरुन सरकारला कोंडीत धरायचा प्रयत्न करत आहेत. आज विरोधकांनी नवाब मलिकांच्या राजिनाम्यावरून एकच गोंधळ केला. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायरीवर जोरदार आंदोलन केलं.
[read_also content=”नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने केली अटक https://www.navarashtra.com/india/former-national-stock-exchange-chief-executive-chitra-ramakrishna-arrested-by-cbi-250431.html”]
नवाब मलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आज विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.हातात पोस्टर घेऊन विरोधक विधानभवनाच्या पायरीवर बसले होते. ‘दाऊद के दलालों को जुते मारो सालों को’, ‘ठाकरे सरकार हाय हाय, नवाब मलिक हाय हाय’, ‘मुंबई की गलियाँ सुनी है, ठाकरे सरकार खुनी है’, अशा जोरदार घोषणा भाजपच्या (bjp) आमदारांनी दिल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांनी पायरीवरच ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तसेच जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू. दाऊदशी संबंधित मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवलेच कसे जाऊ शकते? असा सवाल करत विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
[read_also content=”शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीशीही भाजपने घेतले वैर; शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात नवा संघर्ष https://www.navarashtra.com/latest-news/after-shiv-sena-now-bjp-has-taken-enmity-with-ncp-also-sharad-pawar-vs-devendra-fadnavis-new-struggle-in-state-politics-nrvk-250539.html”]