दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव
Municipal Election Result 2026 News Marathi : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात सुरु आहे. यासाठी २,२९९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याचदरम्यान मुंबई महानगरपालिकेत दादरमधील १९४ प्रभागातून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दादरमध्ये होल्ड असल्याचं म्हटलं जाणार शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी मोठा धक्का बसला आहे. समाधान सरवणकर हे सदा सरवणकरांचे पूत्र असून त्यांनी १९४ प्रभागातून निवडणूक लढवली होती. यात समाधान सरवणकर पराभूत झाले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे निशिंकात शिंदे विजयी झाले आहे. दादरमध्ये हाय व्होल्टेज प्रभागांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव केला. सरवणकर कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने मारलेली ही मुसंडी शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी भाजपने ६६ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे गट ५४ जागांवर, काँग्रेस ५ आणि मनसे आघाडी ५ जागांवर आघाडीवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत, मुंबई महानगरपालिकेत ठाकरे भाजपला काँटे की टक्कर देत आहेत.
समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर, ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी शपथ घेतली होती की सरवणकर नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला, त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते, आज मी त्यांच्या हातात नारळ देणार.’






