Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

CSMT Sawantwadi Express: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे CSMT ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन डेली एक्स्प्रेस सुरू करणार आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 11:20 AM
चला, कोकण आपलाच असा...! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

चला, कोकण आपलाच असा...! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Follow Us
Follow Us:
  • कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर
  • CSMT-सावंतवाडी नियमित एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
  • कणकवली-कुडाळसह 21 स्थानकांना मिळणार कनेक्टिव्हिटी
CSMT Sawantwadi Express: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन डेली एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. कोकणवासीयांकडून अनेक दिवसांपासून थेट आणि नियमित रेल्वे सेवेची मागणी केली जात होती. त्यानुसार ही नवीन सेवा सुरू होत आहे. (CSMT Sawantwadi Express)

या एक्स्प्रेसला 3 सप्टेंबर 2026 रोजी CSMT येथून या नव्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी ट्रेन क्रमांक 01001 दुपारी 12.50 वाजता CSMT येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात दाखल होईल. उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हिडिओ प्रसारणाद्वारे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थिती असणार आहे.

Train Cancelled: बापरे! आता काय करायचं? रेल्वेचा मोठा निर्णय; २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘या’ गाड्या धावणार नाहीत

कोणत्या स्थानकांवर थांबणार ट्रेन?

ही ट्रेन CSMT येथून निघाल्यानंतर दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबून सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांना थेट रेल्वे सेवेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

ट्रेनमध्ये कोणते कोच असणार?

प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन ट्रेनमध्ये एसीपासून जनरल डब्यांपर्यंत वेगवेगळ्या श्रेणींची सुविधा असणार आहे. ट्रेनमध्ये 1 AC First Class, 2 AC 2-Tier, 3 AC 3-Tier, 4 Sleeper Class आणि 4 General Second Class कोच असतील. याशिवाय Second Seating-cum-Guard Brake Van आणि Generator Vanचाही समावेश असेल.

कणकवली-कुडाळ-सावंतवाडीच्या प्रवाशांना मोठा फायदा

नवीन डेली एक्स्प्रेसचा सर्वाधिक फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी परिसरातील प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि दक्षिण कोकणादरम्यान दररोज प्रवास करणारे प्रवासी, व्यापारी आणि पर्यटकांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नियमित सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या इतर गाड्यांवरील प्रवाशांचा ताण काही प्रमाणात कमी होण्यासही मदत होऊ शकते.

कोकण पर्यटनालाही मिळणार चालना

नव्या रेल्वे सेवेमुळे दक्षिण कोकणातील पर्यटनालाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. सावंतवाडी परिसरासह आंबोली, तारकर्ली आणि गोवा सीमेलगतच्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना आणखी एक रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबईतून सिंधुदुर्गला जाणाऱ्या पर्यटकांसाठी नियमित रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे स्थानिक पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

Regular Service चे वेळापत्रक नंतर

उद्घाटन विशेष ट्रेननंतर CSMT-सावंतवाडी रोड डेली एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू होणार आहे. मात्र, Regular Service चे संपूर्ण वेळापत्रक, ट्रेन क्रमांक आणि इतर तपशील रेल्वेकडून स्वतंत्रपणे अधिसूचित केले जाणार आहेत. नवीन डेली एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून, प्रवासी सुविधांसोबतच दक्षिण कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Mumbai Local पुन्हा हादरली! दरवाजा बंद करण्यास सांगितलं अन् जीव गेला; अंधेरी-बोरिवलीदरम्यान २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला

Web Title: Csmt sawantwadi express daily train konkan mumbai new rail service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • central railway
  • Ganeshotsav 2026
  • maharashtra
  • railway

संबंधित बातम्या

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी
1

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
3

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
4

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.