2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपही जाहीर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मंगळवारीच महायुतीचे जागावाटप जाहीर कऱणार असल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी महायुतीची पत्रकार परिषदही होणार होती. पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कधी जाहीर होणार, महायुतीची पत्रकार परिषद रद्द का झाली, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
त्यानंतर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळीही महायुतीचे जागावाटप जाहीर होईल असी अपेक्षा होती. पण आजही महायुतीचे जागावाटप झाले नाही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागावाटपाबद्द्ल विचारण्यात आले, याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जागावाटपाचे काम जवळपास होत आले आहे. जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच जागा राहिल्या आहेत. कोणत्या ठिकाणी कोणत्या पक्षाची ताकद आहे. तीनही पक्ष मिळून कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. कोणाकडे चांगला उमेदवार हे सर्व पाहून आम्ही जागावाटप करत आहोत. फॉर्म्युला मध्येच सांगता येत नाही. जागावाटप झाले की त्यादिवशी कोणाला किती जागा मिळाल्या तेही सांगू आणि फॉर्म्युलाही सांगू.
दरम्यान, आतापर्यंत जवळपास 240 जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. पण 48 जागांचा तिढा अद्याप कायम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भाजपने 120 हून जास्त जागा मिळवण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. त्यासाठी 155 ते 160 जागा लढण्याबाबत भाजपचे ठामपणे ठरवले आहे. भाजपने 155 ते 160 जागा लढवल्यास शिंदे गट आणि पवार गटाला 128-133 जागाच शिललक राहतात. त्यातही 70-80 जागा शिंदे गटाला आणि 50-60 जागा अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपासाठी अजून दोन-तीनदिवस लागण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या जागांसाठी वाद आहे. त्याठिकणी भाजपचे पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील अशी माहिती समोर आली आहे.
भाजप 155 जागांवर ठाम असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गट यांचेही जागावाटप रखडले आहे. त्यातच काही जागांवर महायुतीतील तीनही पक्षांनी दावा केल्याने या जागांवाटप रखडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरच हा तिढा सुटू शकतो. दरम्यान नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: प्रेयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बनला गँगस्टर! लॉरेन्स बिष्णोईची प्रेमकहाणी माहिती आहे का?