प्रातिनिधीक छायाचित्र
मुंबई : मुंबईतील(Fire In Mumbai) विलेपार्ले परिसरातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला (Fire At Prime Mall Irla Area) आज आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की दूर-दूरुन दुराचे लोट पहायला मिळत आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट(Irla Market Fire) परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा परिसर अतिशय गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत.
Entire Irla lane is shut due to massive fire at Prime mall pic.twitter.com/a005DHeuqR
— Saloni Jhaveri (@SaloniJhaveri4) November 19, 2021
इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हा बाजार ओळखला जातो. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाने ही लेव्हल तीनची आग असल्याचं जाहीर केलं आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी गुरुवारी मुंबईतील (Mumbai) पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला गुरुवारी भीषण आग लागली होती. आता शुक्रवारी पुन्हा मुंबईत आगीची घटना घडल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.