धक्कादायक! मशीनच्या बेल्टमध्ये अडकून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अंबरनाथमधील घटना (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीमध्ये एका कंपनीत ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कंपनीतील मशीनच्या बेल्टमध्ये अडकून या 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. एमआयडीसीमधील राधे कृष्ण बेकर्स या कंपनीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेदेखील वाचा- दिवाळी आणि छठ पूजा उत्सवादरम्यान 28 फेस्टिवल स्पेशल ट्रेन धावणार! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व शहरातील आंनद नगर एमआयडीसीमधील राधे कृष्ण बेकर्स या कंपनीत आयुष चव्हाण या तीन वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आंनद नगर एमआयडीसीमध्ये राधे कृष्ण बेकर्स ही बिस्कीट बनवणारी कंपनी आहे. यामध्ये कामानिमित्त पूजा चव्हाण ही महिला आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन कंपनीत आली होती. मुलाला घरी सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने ती मुलाला सोबत घेऊन कामावर येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मात्र यावेळी तीन वर्षीय आयुष हा कंपनीत असतांना याच वेळी तो बिस्कीट बनवणाऱ्या मशीनजवळ पोहचला आणि काही क्षणातच तो मशीनच्या बेल्टमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत चिमुकल्या आयुषला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा- राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेच्या आंनद नगर एमआयडीसीमध्ये राधे कृष्ण बेकर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत ही दुर्दैवी घटना घडली असून आयुष चव्हाण या 3 वर्षीय चिमुकल्याने आपला जीव गमावला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. कंपनीतील मशीनच्या बेल्टमध्ये अडकून या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय आयुष हा कंपनीत असतांना बिस्कीट बनवणाऱ्या मशीनजवळ पोहोचला आणि काही क्षणातच तो मशीनच्या बेल्टमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. चिमुकल्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.