(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुंबईच्या नेहरू सेंटर, वरळी येथे २३ ते २६ जानेवारी दरम्यान १३ वा इंडिया आर्ट फेस्टिव्हल भरवला जाणार आहे. या महोत्सवात ४० आर्ट गॅलरी आणि ५५० हून अधिक कलाकारांची ५,५०० पेक्षा जास्त कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये मिळालेल्या जबरदस्त यशानंतर मुंबईतला हा फेस्टिव्हल कला प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. यात समकालीन, पारंपरिक, आणि आधुनिक कलेचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. निसर्गचित्रं, ग्रामीण आणि शहरी जीवनावर आधारित कलाकृती, फ्युचरिस्टिक आर्ट, आणि मूर्तिशिल्पांनी सजलेला हा सोहळा कलाप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
कलाप्रेमी आणि संग्राहक यांच्यासाठी, इंडिया आर्ट फेस्टिव्हल 2024 हा विविधतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या कालातीत आकर्षणाचा उत्सव आहे. या वर्षी इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये केवळ व्हिज्युअल मेजवानीच नाही तर फ्यूजन शो, लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स, मंत्रमुग्ध करणारी लाईव्ह पेंटिंग प्रात्यक्षिके आणि मनमोहक फिल्म स्क्रिनिंगही सादर केले जात आहेत. राजेंद्र पाटील, इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे संस्थापक आणि संचालक, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, 1888 मध्ये स्थापन झालेल्या सर्वात जुन्या भारतीय कला संस्थांपैकी एक आणि इंडियन कंटेम्पररी आर्ट जर्नल या त्रैमासिक कला मासिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही काम करतात.
यंदाचा उत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिक रंगतदार होणार आहे. लाईव्ह पेंटिंग डेमो, फ्युजन शो, आणि लाईव्ह म्युझिकच्या साथीनं कलेचं हे प्रदर्शन अधिक सजीव होईल. विशेषतः “दि इटर्नल कॅनव्हास १२,००० वर्षांचा भारतीय कलेचा प्रवास” हा चित्रपट भारतीय कलेच्या समृद्ध इतिहासाचं दर्शन घडवणार आहे. हा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जोरात साजरा होणार आहे. राजेंद्र पाटील, फेस्टिव्हलचे संस्थापक आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, या सोहळ्याच्या मागची प्रेरणा सांगताना म्हणतात, “उभरत्या आणि मध्यम पातळीच्या कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.
राशा थडानीनंतर आता गोविंदाचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; बाबिल खानही दिसेल मुख्य भूमिकेत!
या प्रदर्शनात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, सिंगापूर आणि इतर ठिकाणांहून आलेल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय गॅलरींनी सहभाग घेतला आहे. ग्नानी आर्ट्स, बियॉन्ड द कॅनव्हास, स्टुडिओ ३ आर्ट गॅलरी अशा प्रतिष्ठित गॅलरींच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. नवोदित कलाकारांपासून ते प्रथितयश कलाकारांपर्यंत सर्वांचे योगदान या फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरले आहे. कलाप्रेमींनी ही सुवर्णसंधी अजिबात चुकवू नये. भारतीय कलेच्या विविध छटा अनुभवण्यासाठी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्यासाठी या फेस्टिव्हलला आवर्जून भेट द्या. याने तुम्हाला खूप आनंद आणि प्रसन्न वाटेल याची नकीच खात्री आहे.