नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ
पुन्हा एकदा EVM चा प्रश्न उपस्थित करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी याच महाविकास आघाडीच्या आमदारांसह एकूण 105 आमदारांनी आज शपथ घेतल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांमध्ये 279 आमदारांचा शपथविधी पूर्ण झाला असून 8 आमदार मात्र गैरहजर राहिले. उर्वरित आमदारांचा शपथविधी हा सोमवारी पूर्ण करण्यात येईल. दरम्यान संस्कृत आणि अहिराणी भाषांमध्ये काही आमदारांनी शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नाना पटोले, आदित्य ठाकरे, मंगलप्रभात लोढा यांच्यासारख्या नावाजलेल्या आमदारांनी आज शपथ घेतली. राज्य विधीमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन शनिवारपासून मुंबईतील विधान भवनात सुरु झाले आहे. या अधिवेशनात नवनियुक्त आमदारांचा शपथविधी आयोजित करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – Instagram)
पहिले विरोध मग शपथ
रविवारी अनेक प्रथमच आमदारांनी शपथ घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही गर्दी या सोहळ्याला विधानभवनाच्या आवारात दिसून आली. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही आज शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, काल आमचा प्रतिकात्मक निषेध असून आम्ही शपथ घेतली नसती तर जनतेचे प्रश्न कसे मांडले असते. आम्ही शपथ घेतली नसती तर सत्ताधाऱ्यांनी मनात येईल ते केले असते. आज आम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शपथ घेतली आहे. त्यांच्या मतांमुळे नवे सरकार निवडून आलेले नाही, असा विश्वास असल्यानेच ते जनतेचे प्रश्न मांडत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही आमदारांनी शपथ घेतली. 173 आमदारांनी शनिवारी शपथ घेतली तर अनुपस्थित 8 आमदार सोमवारी शपथ घेणार आहेत.
नाना पटोलेंची निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; म्हणाले…
8 अनुपस्थित उमेदवार
विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ विधीसाठी ठेवले होते. तर तिसऱ्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम जाहीर केला होता. 287 पैकी पहिल्या दिवशी 173 तर दुसऱ्या दिवशी 106 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यापैकी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहणार नाही, असे पत्र विधिमंडळाला दिले होते. हे 8 आमदार आता सोमवारी कामकाजादरम्यान शपथ घेतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा असू शकतो विरोधी पक्षनेता; काय सांगतो नियम?