मंगल प्रभात लोढा (फोटो -ट्विटर)
सांताक्रुझ पुर्वेकडील कलिना कॅम्पस् येथील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे बुधवारी ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानामध्ये शाळा, महाविद्यालय, संस्था व संघटना आणि पोलीस प्रशासन इत्यादींनी उत्तम कामगिरी केली. अशा २१ जणांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. नशेद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती पण समाजात प्रवेश करत आहे, त्याचा ही धोका ओळखा? आज युद्धाची परिभाषा बदलली आहे. तलवार, बंदुक, बॉम्ब किंवा अणुबॉम्बऐवजी नकली नोटा छापून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे किंवा त्या देशातील युवा पिढीला नशेच्या आहारी लावणे, हीदेखील मोठी आव्हाने आहेत. कारण एखाद्या कुटुंबातील युवक व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानांतर्गत विद्यार्थी समुपदेशन सत्र आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात सहाभगी झालेल्या संस्था विविध स्थरावर नशामुक्त युवा पिढी घडविण्यासाठी काम करत आहेत. आजपसून या संस्था एकत्रित प्रयत्नांनातून ड्रग्स फ्री मुंबई अभियानामार्फत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. मुंबईला ड्रग्स फ्री करण्यासाठी आणि आपल्या युवकांना अमली पदार्थांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आपणही त्यांच्या प्रयत्नांना साथ देऊन आपले योगदान देऊया. आपल्या भावी पिढीच्या रक्षणासाठी एकत्र येऊया आणि मुंबईला ड्रग्स फ्री करूया! #DrugFreeMumbai #नशामुक्तमुंबई #DrugFreeYouth #SocialAwareness #MPLodha — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 7, 2026
मुंबईचा विकास होत असताना मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनीही ‘ड्रग्स फ्री भारत’चा संकल्प व्यक्त केला आहे. युवकांच्या शक्तीवरच विकसित भारताची उभारणी होणार आहे. त्यामुळे युवकांनी नशेपासून दूर राहावे आणि ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केले.
Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी ‘किशोरावस्था’ या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हकुमारी प्रशांती यांनी ‘Be Smart Be Strong Within’ याविषयावर मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या गोष्टींची योग्य ‘निवड’ कशी करावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस अधिकारी, संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






