Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : अधिवेशनात वक्फ विधेयक सादर करण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यावरुन देशामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज (दि.04) हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित होणार का याची संपूर्ण देशभरातून उत्सुकता आहे. ही विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला 272 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. भाजपकडे 240 सदस्य आहेत, मात्र भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे.
03 Apr 2025 05:37 PM (IST)
वक्फ बोर्ड सुधारित विधेयकाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, "बुधवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी होता. वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. ते म्हणतात की आमचा वक्फ बिलाला विरोध नाही भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे. अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीत ते आहेत.मुळे घर का ना घाटका अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली आहे," असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.
03 Apr 2025 05:27 PM (IST)
बारामती तालुक्यातील सांगवी गावात हृद्यद्रावक घटना घडली आहे. झोपेत असलेले दाम्पत्य विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली. उन्हाळ्यामुळे पंख्यातून वीज प्रवाह लोखंडीत काॅटमध्ये उतरल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
03 Apr 2025 05:25 PM (IST)
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीची बाजारपेठ सुरू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, तसेच वाहतुकीवरील कर कमी व्हावा यासाठी बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
03 Apr 2025 05:15 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. वक्फ सुधारित विधेयकाविरोधात ठाकरेंच्या खासदारांनी मतदान केल्याने शिंदे यांचा समाचार घेतला. त्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. यूटी म्हणजे यूझ अन्ड थ्रो म्हणजे वापरा आणि फेका, असा शॉर्ट फॉर्म करत शिंदेंनी त्यांना इशाराही दिला.
03 Apr 2025 04:55 PM (IST)
कोकणात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंब्यावर दिसू लागलाय. आंब्यावरती डाग पडल्याने आंब्याच्या बाजार भावावर परिणाम झालाय. तर दुसरीकडे असलेले ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर किड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आणि त्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे. शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
03 Apr 2025 04:55 PM (IST)
रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. याला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.
03 Apr 2025 04:26 PM (IST)
मणिपूर येथील परिस्थिती लक्षात घेता येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला. या प्रस्तावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे.
03 Apr 2025 04:24 PM (IST)
हवामान विभागाकडून राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
03 Apr 2025 04:14 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे. साधारणपणे 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे.
03 Apr 2025 03:59 PM (IST)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याने विकास आराखड्याची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे. प्रारूप विकास आराखड्यास कशा प्रकारे हरकती घ्याव्यात यासाठी जमीन मालकांचे विशेषत: शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे सल्ला ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर ए. आव्हाड यांनी दिला आहे.
03 Apr 2025 03:57 PM (IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्राची टक्केवारी अत्यंत कमी आहे. धाराशिव, बीड, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तर वनक्षेत्र १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. राज्याच्या एकूण भूपृष्ठाच्या सरासरी २० टक्के क्षेत्रावरच वनक्षेत्र आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री नाईक यांना विशेष मोहिम आखून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली
03 Apr 2025 03:18 PM (IST)
राज्यसभेत भाजप खासदार राधा मोहन दास यांनी वक्फ विधेयकाला क्रांतिकारी म्हटले. ते म्हणाले की वक्फ विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना फायदा होईल.
03 Apr 2025 03:04 PM (IST)
वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर करण्यात आले. त्यावर राज्यसभेत चर्चा आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर राज्यसभेत आजच मतदान होईल.
03 Apr 2025 02:43 PM (IST)
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
Sindhudurg | दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा सुरू#sindhudurg #MarathiNews #MaharashtraNews pic.twitter.com/ljYub8I4xT
— Navarashtra (@navarashtra) April 3, 2025
03 Apr 2025 02:42 PM (IST)
कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे अशी मागणी केली जात आहे. अनुदान दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भारत दिघोळे यांनी दिला आहे.
NASHIK | कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे अन्यथा आंदोलन करणार - भारत दिघोळे#nashik #maharashtra #MarathiNews pic.twitter.com/EdwKx1MOxn
— Navarashtra (@navarashtra) April 2, 2025
03 Apr 2025 02:12 PM (IST)
आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या सदर प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.
03 Apr 2025 02:10 PM (IST)
उन्हाळा सुरु झाल्यामुळे अनेक लहान व तरुण मुले पोहण्यासाठी जात आहेत. काल (दि.02) दुपारी जनता वसाहत कॅनोलमध्ये एक मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून दोन अग्निशमन वाहने दाखल झाली असून अद्याप शोधकार्य सुरु आहे.
03 Apr 2025 02:08 PM (IST)
देशाच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं सगळ्यांनी केली. हे बिल मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात आहे? जर बाजूने असेल तर मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का? तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
03 Apr 2025 01:09 PM (IST)
"काल अमित शाह यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. वक्फ बोर्डाच्या मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करु हे नकळत सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं. या मोकळ्या जमिनीची किंमत 2 लाख कोटी रुपये आहे. मुंबईच्या जमिनीचा व्यवहार आधीच ठरला आहे," असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
03 Apr 2025 12:33 PM (IST)
राज्य सरकारी महावितरण कंपनीच्या वीज दरकपातीची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर सर्वसामान्यांना वीज बिलातून दिलासा मिळेल, असे म्हटले जात होते. असे असताना आता राज्य सरकारी महावितरण कंपनीच्या वीज दरकपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने बुधवारी स्थगिती दिली.
03 Apr 2025 12:26 PM (IST)
ट्रम्पच्या ‘मुक्ती दिना’च्या घोषणेत कोणत्याही देशाला सूट देण्यात आली नाही, कारण त्यांनी १८० हून अधिक देशांसाठी नवीन कर आकारणी दर जाहीर केले. देश-विशिष्ट शुल्काव्यतिरिक्त, ट्रम्पने १०% बेसलाइन शुल्काची घोषणा देखील केली. तथापि, त्यांनी अमेरिकन उत्पादनांवर इतर देशांनी लादलेल्या दराच्या निम्म्या दराने परस्पर शुल्क लादले. तरीही, हे बाजारासाठी चिंताजनक ठरले, कारण टॅरिफ जाहीर झाल्यानंतर डाऊ जोन्स फ्युचर्स १.५% पेक्षा जास्त घसरले.
03 Apr 2025 12:26 PM (IST)
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर सरसकट माफ करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी केली आहे. बुधवारी भोईर यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी लेखी निवेदनाद्वारे अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील ५०० चौ. फुटांच्या चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
03 Apr 2025 12:18 PM (IST)
जळगावच्या अमळनेर तालुक्यात रात्री गावात भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून आगीत पाच घरे पूर्णपणे खाक झाली आहेत. गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून काही वेळातच आग पसरली. यात एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी पारोळा ,चोपडा ,धरणगाव येथून देखील अग्निशमन दल मागवण्यात आले आहेत.
03 Apr 2025 12:17 PM (IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संबंधित लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण बोर्ड मे 2025 मध्ये दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपत आहेत. दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील. परीक्षा संपताच निकालाची वाट पाहणे साहजिकच आहे. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती पण ४ एप्रिल रोजी संपेल. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे.
03 Apr 2025 11:33 AM (IST)
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाला उद्या खिंडार पडणार असून अनेक नेते प्रवेश करणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे.
03 Apr 2025 11:29 AM (IST)
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, वक्फ दुरुस्ती विधेयक केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी आहे. अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. चीनमधून होणारी आयात लक्षणीय वाढली आहे. शून्य प्रहरात विरोधक राज्य सरकारांवर हल्ला करतात, आपल्याला तिथे त्यांना उत्तर द्यावे लागेल.
03 Apr 2025 11:28 AM (IST)
लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणाले की, आम्ही वक्फ विधेयकाला बेकायदेशीर विधेयक मानतो. देशातील जमीन मोठ्या उद्योगपतींना देण्यात आली. आता ही जमीन देखील त्याच उद्योगपतींना देण्याचा विचार आहे.
03 Apr 2025 11:28 AM (IST)
छत्रपती संभाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाविरोधात शिवधर्म फाऊंडेशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी ब्रिगेडच्या विरोधात डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांनी आंदोलन सुरू केले असून थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.
03 Apr 2025 11:27 AM (IST)
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांनाच्या वीजबील वाढीला स्थगिती देण्यात आली होती. हळूहळू हे वीजबील आणखी कमी करण्याचे धोरण होते. मात्र, एमएसबीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
03 Apr 2025 11:26 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर तब्बल 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोणा केली. या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 450 अंकांनी खाली घसरला. गुंतवणुकदारांचे अंदाजे 3.27 लाख कोटी रुपयांच नुकसान झाल्याची माहिती आहे.
03 Apr 2025 11:13 AM (IST)
ठाकरे गटाकडून संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारक विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे विधेयक म्हणजे सत्ताधाऱ्यांनी मुस्लीमांच्या संपत्तीवर कब्जा करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
03 Apr 2025 11:09 AM (IST)
वक्फ सुधारक विधेयकावरुन संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. लोकसभेमध्ये विधेयक पारित झाले असून राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या वडणगेच्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे.
03 Apr 2025 10:58 AM (IST)
वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. त्याचबरोबर भाजप नेते व मंत्री जे.पी.नड्डा हे दुपारी 1 वाजता वक्फ बोर्डवर मत मांडणार आहे.
03 Apr 2025 10:35 AM (IST)
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष मराठी भाषेच्या आग्रहासाठी आक्रमक झाला आहे. राज्यामध्ये सर्व कार्यालयामध्ये मराठी अनिवार्य वापरले पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. यासाठी लालबागच्या आयकर भवनाबाहेर मनसेचे आंदोलन सुरु आहे. बॅंक, सहकारी, खाजगी कार्यालयामध्ये मराठी भाषा वापरली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
03 Apr 2025 10:32 AM (IST)
वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झालेल्यावर भाजप नेते सीआर केशवन म्हणाले की, "हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या परिवर्तनकारी राजकारणासाठी एक महत्त्वाचा विजय आहे. यामुळे वंचित मुस्लिम समुदायाच्या प्रगती आणि समृद्धीच्या नवीन सुवर्णयुगाची सुरुवात होईल..."
03 Apr 2025 10:29 AM (IST)
रधाव बोलेरो एसटी बसवर आदळल्यानंतर मागून येणारी ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त बसवर आदळली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. हा अपघात खामगाव-शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यानजीक बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांतून बाहेर काढून तातडीने खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
03 Apr 2025 10:28 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यात या उष्णतेचा सामना करणाऱ्या मालेगाव तालुक्यात बुधवारी दुपारी पावसाने अचानक हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील काही भागांत तुरळक पाऊस पडला. मात्र, या पावसाने अपेक्षित गारवा मिळण्याऐवजी वातावरण आणखी उष्ण झाले. ढगाळ हवामान आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.