गुढीपाडव्यादिवाशी प्रवाशांचे होणार हाल! बदलापूर ते कर्जत लोकल सेवा रद्द, मध्य रेल्वेचा रविवारी ३ तास स्पेशल ब्लॉक (फोटो सौजन्य-X)
Centrail Railway News : मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांचे रविवारी, ३० मार्च गुढी पाडव्यादिवाशी हाल होणार आहेत. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत बदलापूर ते कर्जत स्थानकादरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉक दरम्यान काही लोकल गाड्या बदलापूर स्थानकापर्यंतच धावणार आहे. सकाळी ९.३० ची सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तर रविवारचा मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान असणार आहे.
बदलापूर स्थानकापर्यत लोकल : स ९.५७, स.१०.३६ ची, स. ११.१४ ची सीएसएमटी-कर्जत, दु. १२.०५ ची ठाणे-कर्जत, दु.१२.२० ची सीएसएमटी-खोपोली बदलापूर स्थानकातून मुंबईच्या दिशेने स.११.१५.दु.१२,दु.१२.२३, दु.१ ची कर्जत-सीएसएमटी, दु.१.२७ ची कर्जत-ठाणे
■ ११०१४ कोइम्बतूर-एलटीटी एक्सप्रेस, १२६१४ चेन्नई एलटीटी एक्सप्रेस, १२४९३ मिरज हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कर्जत पनवेल मार्गावरून चालविण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांना पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा दिला आहे.
■ २२१५९ सीएसएमटी-चैन्नई एक्सप्रेस दुपारी २.११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकात थांबविण्यात येणार आहे. १७२२२ एलटीटी- काकीनाडा एक्सप्रेस २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरुन वळविण्यात येणार आहेत. परिणामी लोकल नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावतील.
सांताकुझ ते माहिम स्थानकांदरम्यान आज, २९ मार्च रोजी नाईटब्लॉक घेण्यात येणार आहे. डाउन धिम्या मार्गावर रात्री १ते पहाटे ३.३० आणि अप चिम्या मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर लोकल जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने लोअर परेल, माहिम आणि खार रोड स्थानकात लोकलला दोनदा थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत. रविवार, ३० मार्च रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.