मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा
Mumbai local mega Block Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी कृपया इकडे लक्ष द्या. उद्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. उद्या रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आणि तांत्रिक कारणांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच काही गाड्या उशीराने धावणार आहे.
हेदेखील वाचा- तीन महिन्याचे वेतन काढण्यासाठी मागितली 40 हजार रुपयांची लाच, उप शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
उद्याच्या रेल्वे मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवारी मध्यरात्री १२ ते उद्या सकाळी १० पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर लक्ष द्यावे. मेगाब्लॉक दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या उशीराने धावणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या मार्गावरील लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. तर ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकलला थांबा नसेल.
हेदेखील वाचा- कुडाळमध्ये पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी अप व डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मेगाब्लॉक काळात सीएसएमटी, कुर्ला व पनवेल वाशी या मार्गावर नागरिकांसाठी विशेष लोकल चालवली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव व कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर आज मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत लोकल गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ वर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.