घामाच्या धारा लागणारी मुंबई गाठली; आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबई म्हटली की घामाच्या धारा लागतात. मात्र उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. तर मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत १६.५ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं आहे. गेल्या आठ वर्षांतलं हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे.
हवामानाविषयी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईचं तापमान १६.३ डिग्रीपर्यंत खाली गेलं होतं. दुसरीकडे कुलाबा वेधशाळेने २१.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली आहे.
नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये थंडीची लाट नाही. उलट तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतलं तापमान एवढं खाली जाण्याची चार दिवसांमधली ही दुसरी वेळ आहे.
२६ नोव्हेंबर रोजी भारताच्या आर्थिक राजधानीने १६.८ डिग्री सेल्सिअस या किमान तापमानाची नोंद केली आहे. याच दिवशी कुलाबा वेधशाळेने २२.५ डिग्री तापमानाची नोंद केली.
प्रदूषणाविषयी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी म्हणाले की, बंगालच्या उपसागरातील वातावरण बदलामुळे ३ डिसेंबरनंतर वातावरण बदलून थंडी कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे वातावरण बदललेलं आहे. शनिवारपासून बंगालच्या उपसागरामध्ये दबाव निर्माण होईल आणि वातावरण गरम होईल. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’ने हे वृत्त दिले आहे.






