ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार? किती टप्प्यात होणार निवडणुका?
विधानसभा निवडणूक होऊ कित्येक महिने लोटले तरी अद्याप महापालिका निवडणुकांचा घोषणा झालेली नाही. सलग तीन वर्ष राज्यात महापालिका निवडणूका झालेल्या नाहीत तर काही महापालिकांवर ४-५ वर्षांपासून प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुका नक्की कधी होणार याकडे लक्ष लागलं आहेत. पक्ष कार्यकर्त्यांचाही उत्साह मावळला आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Mumbai Heat: उन्हाच्या झळांचा पक्ष्यांनाही फटका, १६ दिवसांमध्ये ५८ पक्षी तर तीन श्वान जखमी
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तरी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आगामी 4 मेला सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगर पालिका पावसाळ्याअगोदर होणार नाहीत, असंच दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी वेळ लागणार असल्याची माहिती आहे.
Digital Arrest : मुंबईत सर्वात मोठी ‘डिजिटल अरेस्ट’ची घटना; ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक
महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली. त्यामुळे प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचा की निवडणूक आयोगाचा यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थांचा सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला होता. त्यावर देखील आक्षेप घेण्यात आला. तसेच ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज संस्थामध्ये लागू करण्यासंदर्भात वाद सुरु होता. ओबीसी आरक्षणासंदर्भात अद्याप न्यायालयाकडून कोणताही निकाल आलेला नाही. यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत, असे बोललं जात आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत चर्चा सुरु आहे. कारण हा माहापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांदणीला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. तर महायुती महापालिकेच्या निवडणुका एकत्रच लढणार असल्याचं सागण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवरक शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं यावेळी भाजपनं नियोजन करत महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.