Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप
जळगावातील प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये कथित बोगस वोट्समुळे मोठा गोंधळ झाला होता. याप्रकरणी अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी काही गंभीर आरेप केले आहेत. जळगावातीव प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. सकाळपाससून संशयास्पद मतदार आल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 40 ते 50 मतदारांकडून ओळखपत्र आणि आवश्यक पुराव्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र पुरावे नसल्याने संबंधित नागरिकांना मतदान करता आले नाही. या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी पियुष पाटील यांनी केली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
नालासोपारा पूर्वेतील पेल्हार फाटा येथे एका स्कूटीच्या डिक्कीमध्ये 10,000 रुपये आणि 15,000 रुपयांचे पाकीट मिळाली. यामध्ये एकूण 10 लाख 9 हजार रुपये कॅश होती. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिस स्थानकात स्कूटरच्या मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अकोल्यातील एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याची घटना घडली. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अकोला महापालिकेतील प्रभाग 17 मधील महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर हा संपूर्ण घडला. या मतदान केंद्रावर सकाळपासूनच लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झााल आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबई, पुणे, संभाजी नगर, ठाणे, इत्यादी अनेक ठिकाणी सकाळपासून अनेकवेळा ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. ईव्हीएम मशीन बराच वेळ सुरु न झाल्याने बरेच मतदार पुन्हा घरी गेले.






