(फोटो सौजन्य: Pinterest)
‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
सायप्रसस्थित ‘पारिमैच’ प्लॅटफॉर्मने अवैध सट्टेबाजीच्या माध्यमातून अवघ्या एका वर्षात ३,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केल्याचा संशय आहे. मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. यापूर्वी २६ मे रोजीही ईडीने या प्रकरणाशी संबंधित १७ ठिकाणी छापे टाकले होते. त्या कारवाईत रोख रक्कम आणि बँक खात्यांतील शिल्लक मिळून सुमारे ५.३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त किंवा गोठवण्यात आली होती. ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती सुमारे ३ हजार कोटींपर्यंत असल्याचा संशय ईडीला आहे.
व्यावसायिकांचा केला गैरवापर
संपूर्ण आर्थिक व्यवहारात कॅश मॅनेजमेंट सिस्टम (सीएमएस) एजंट, बैंकिंग करस्पॉडंट (बीसी) नेटवर्क, किराणा दुकाने तसेच स्थानिक किरकोळ व्यावसायिकांचा गैरवापर करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. सीएमएसच्या माध्यमातून जमा केलेली रोख रक्कम आरटीजीएस – व्यवहारांशी समायोजित केली जात – होती. त्यानंतर हवाला मार्ग, बनावट परदेशी थेट गुंतवणूक आणि परदेशी – रेमिटन्सच्या माध्यमातून हा पैसा भारताबाहेर पाठवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
किराणा वितरण ॲप्सवरही केल्या जाहिराती
आर्थिक व्यवहारांना मदत केल्याच्या संशयावरून काही सनदी लेखापाल (सीए) आणि कंपनी सेक्रेटरी (सीएस) यांच्या ठिकाणांवरही ईडीने झाडाझडती घेतली. दरम्यान, भास्तात आपली पोहोच वाढवण्यासाठी ‘पारिमॅच’ने कथितरीत्या छद्मয় जाहिरातींचा आधार घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. ‘पारिमॅच स्पोर्ट्स’ आणि ‘पारिमंच न्यूज’ या नावांचा वापर करून देशातील १५ हून अधिक राज्यांमध्ये स्थानिक क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल स्पर्धांना प्रायोजित करण्यात आल्याचे समोर आले आहे. नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्विक-कॉमर्स आणि किराणा वितरण करणाऱ्या अॅप्सवरही नियोजनबद्ध पद्धतीने जाहिराती दाखवण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.
फिनटेक कंपन्यांचे गुंतागुंतीचे जाळे
तपासादरम्यान, सट्टेबाजी करणाऱ्या ग्राहकांकडून पैसे गोळा करण्यासाठी तसेच त्यांची रक्कम विविध खात्यांमध्ये वळवण्यासाठी बनावट बैंक खाती, पेमेंट गेटवे आणि फिनटेक कंपन्यांचे गुंतागुंतीचे जाळे। उभारण्यात आल्याचे आढळून आले. ग्राहकांनी जमा केलेली रक्कम व्यावसायिक व्यवहार असल्याचे भासवून दुसरीकडे वळवली जात होती. तसेच पैसे काढताना अन्य ग्राहकांनी जमा केलेली रक्कम थेट यूपीआय आणि बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून पैशांचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






