Education News: शिक्षण विभागात घोटाळे, अनियमितता, दादा भुसेंनी राजीनामा द्यावा...; आदित्य ठाकरेंची मागणी
Aditya Thackeray News : महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमिततेवरून युवा सेना प्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी विशेषतः नाराजी व्यक्त केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाला, पण अकरावीची पहिली गुणवत्ता यादी अद्याप जाहीर झालेली नाही. १३ मे रोजी निकाल लागला, पण ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. ही प्रणाली आधी काही निवडक शहरांमध्ये होती, परंतु ती अचानक राज्यभर लागू करण्यात आली, ज्यामुळे वेबसाइट पहिल्याच दिवशी क्रॅश झाली.
Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
ही यादी १० जून रोजी प्रसिद्ध होणार होती, परंतु ती २६ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली.तरीही ती वेळेवर प्रसिद्ध झाली नाही. ही यादी आज लागू होईल की नाही हे निश्चित नाही. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यानच पहिली यादी जाहीर झाल्याची बातमी आली. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर यादी जाहीर करण्यात आली. दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे. असा पुनरूच्चारही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कामावर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी अनेक विभागांमध्ये अनियमितता आणि घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, फडणवीस सरकारचे १०० दिवस पूर्ण झाले आहेत आणि ते म्हणत आहेत की हे धोरण बनवले गेले, ते धोरण बनवले गेले. पण अनेक विभागांमध्ये अनियमितता आणि घोटाळे सुरू झाले आहेत. शालेय शिक्षण विभागात सर्वाधिक अनियमितता झाल्या आहेत. सध्याच्या मंत्र्यांनी बौद्धिक चूक केली आहे.
Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्याचे दर पुन्हा नरामले, चांदीच्या किंमती स्थिर
आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, या गोंधळाला कोण जबाबदार आहे? ती कंपनी कोणी निवडली? अनुभव नसतानाही त्याला हे काम का देण्यात आले? मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का? असे अनेक प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले. दादा भुसे यांच्याकडून शालेय शिक्षण खाते परत घ्यावे आणि त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली.
पहिली यादी जाहीर झाली असताना दुसरी यादी ९ जुलै रोजी का जाहीर होईल, इतका वेळ का लागत आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. “घाणेरडे राजकारण करणे थांबवा. तुमचे सरकार आणि मंत्रिपदे जाहीर करण्यासाठी २ महिने लागले, आता हे गोंधळ दूर करण्यासाठी किती महिने लागतील?” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.