भारताच्या राजकारणात महिला नवी 'व्होट बँक' बनतायेत का? वाचा सविस्तर
मुंबई : मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Majhi Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना परत द्यावे लागणार योजनेचे पैसे? ‘ते’ हमीपत्र वाढवणार अडचणी
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा छाननी होईल, असे म्हटले जात होते. त्यावर आता तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही’.
याबाबतची माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हटलंय महिला व बालकल्याण विभागाच्या पत्रकात?
‘सर्वांना कळविण्यात येते की, राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रील्स व व्हिडीओंद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही’.
कोणताही बदल झाल्यास कळवण्यात येईल
योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलं आहे की त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी”.
हेदेखील वाचा : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अर्जांची छाननी होणार का? तर…