• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Time Will Tell Shiv Senas Advice To Trinamool Congress Nrkk

‘…ते काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!’ शिवसेनेचा तृणमूल काँग्रेसला सल्ला

ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. पश्चिम बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 04, 2021 | 09:08 AM
‘…ते काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!’ शिवसेनेचा तृणमूल काँग्रेसला सल्ला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही.  ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा! असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून तृणमूलच्या नेत्यांना सल्ला देण्यात आला आहे.

काय म्हटलंय सामनात?

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत.

आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या.

ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. पश्चिम बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.

काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख चैन सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत.

काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे, अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत.  ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!

Web Title: Time will tell shiv senas advice to trinamool congress nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2021 | 08:29 AM

Topics:  

  • Saamana Editorial
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut PC: दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात
1

Sanjay Raut PC: दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut News: तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय….: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत
2

Sanjay Raut News: तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय….: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
3

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
4

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धर्मेंद्र हेमा मालिनींसोबत नाही, तर पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात; बॉबी देओलचं वक्तव्य चर्चेत

धर्मेंद्र हेमा मालिनींसोबत नाही, तर पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात; बॉबी देओलचं वक्तव्य चर्चेत

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?

Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

Haval H9 मिळून 1 महिना होत नाही तोच Abhishek Sharma ने खरेदी केली Ferrari Purosangue, किंमत वाचूनच चक्रवाल

Haval H9 मिळून 1 महिना होत नाही तोच Abhishek Sharma ने खरेदी केली Ferrari Purosangue, किंमत वाचूनच चक्रवाल

Idli-Sambhar History:  इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

Idli-Sambhar History: इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

काँग्रेस सरकारने देशातील लाखो गरिबांना जमिनी दिल्या, पण मोदी सरकारने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

काँग्रेस सरकारने देशातील लाखो गरिबांना जमिनी दिल्या, पण मोदी सरकारने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त 

IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त 

व्हिडिओ

पुढे बघा
Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.