नवी मुंबई : रविवारी म्हणजे काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Sshah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्रीसेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये सात-आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#WATCH| Navi Mumbai: Uddhav Thackeray, Aditya Thackeray & NCP leader Ajit Pawar interact with Doctor in MGM Kamothe Hospital, take stock of the situation
11 people died & more than 20 are undergoing treatment after they suffered heatstroke during Maharashtra Bhushan Award… pic.twitter.com/0nNGvGlFXW
— ANI (@ANI) April 16, 2023
रुग्णांची मविआ नेत्यांनी घेतली भेट…
दरम्यान, मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांवर रुग्णालयात जाऊन विचारपूस करत, त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई येथे भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली असून, त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमाला 20 लाख श्री सेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी एकच्या सुमारास संपला, त्यानंतर भर उन्हात इतका वेळ बसलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला.
शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.