६५ कोटींच्या उड्डाणपूल उद्घाटनापूर्वी खचला; नागपुरातील व्हिडिओ व्हायरल
Nagpur Flyover Damage: राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे.मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडणे, पूल वाहून जाणे, नद्या तुंबून वाहणे अशा विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. अशातच राज्याच्या उपराजधानी नागपुरातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. न्यू कामठी आणि ड्रॅगन पॅलेस कॉम्प्लेक्सला जोडणारा उड्डाणपूल उद्घाटनाआधीच खचला असून पूलाला मोठे भगदाड पड्ल्याचे दिसत आहे. या खचलेल्या पुलाचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होतआहे.
खरंतर, नागपूर शहरात न्यू कामठी आणि ड्रॅगन पॅलेसला जोडणारा पूलाचे गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू होते. जवळपास या पूलाचे बांधकामही पूर्ण झाले होते. परंतु नागपूरमध्ये उद्घाटनापूर्वीच हा पूल कोसळल्याने पुलाच्या बांधकामासंबंधी मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केला, जो काही तासांतच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये रस्त्यावर तब्बल ३ फूट खोल खड्डा पडलेला दिसतो, ज्यामुळे नागरिकांमधूम संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरु…; एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. रामनगर रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल कामठी भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात येत होता. मात्र, मुसळधार पावसा मुळे उद्घाटनापूर्वीच खड्डा पडल्यामुळे पूलाच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का, ? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. पुलाचे काम कोसळल्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर ‘हा भ्रष्टाचार आहे’ अशी टीका करत घोटाळ्याचा संशयही व्यक्त केला आहे.नागपूरमध्ये याआधीही पावसामुळे अशा घटना घडल्या असून,प्रशासनाच्या पायाभूत कामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासकामे सुरू आहेत. उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्ग, सिमेंट काँक्रीटचे रस्ते यांसारख्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. या कामांचा दर्जा उत्तम आणि टिकाऊ असावा अशी अपेक्षा खुद्द नेत्यांचीही आहे, मात्र अलीकडील घटनांमुळे या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
Pimpri Crime : काळेवाडीत सात जणांच्या टोळक्याचा राडा; आधी दोघांवर कोयत्याने वार केले अन् नंतर
एका नागरिकाने खचलेल्या पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला स्पष्ट दिसत आहे.या घटनेनंतर बांधकामाच्या दर्जाबाबत तसेच सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूर शहरात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कामे सुरू असली, तरी त्यांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
कामठीतील उड्डाणपूल उद्घाटनाआधीच खचल्याच्या घटनेने प्रशासन आणि कंत्राटदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. संबंधित कंत्राटदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ टाकण्याचीही मागणी स्थानिक पातळीवरून करण्यात आली आहे.
नागपुर में उद्घाटन से पहले धंसा पुल, 5 साल से हो रहा था ब्रिज का निर्माण #Nagarpur #ATVideo #MumbaiMetro #Monsoon2025 #maharashtrarainspic.twitter.com/UZ0m8fbRq3
— Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) July 11, 2025