नागपूर : मनपाचा स्टेशनरी घोटाळा बराच चर्चेत असून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, आता या स्टेशनरी घोटाळ्यात आरोग्य विभागातील भांडारप्रमुख प्रशांत भातकुलकर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर, न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. भातकुलकर यांच्यासह आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, यात आणखी अनेक मोठ्या लोकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशांत भातकुलकर यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”यो यो हनीसिंगला पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा न्यायालयाचा आदेश https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/court-orders-yo-yo-honey-singh-to-appear-at-pachpavli-police-station-nraa-231759.html”]
या प्रकरणात या पूर्वी सदर पोलिसांनी स्टेशनरी पुरविणारा कोलबा साकोळे त्याचा पुतण्या अतुल साकोळे, सामान्य प्रशासन विभागातील ऑडिटर अफाक अहमद, लिपिक मोहन पडवंशी, वित्त विभागातील अधिकारी राजेश मेश्राम यांना अटक केली आहे. तर, आता या प्रकरणात भांडारप्रमुखला अटक झाल्याने या प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर होणार असल्याची चर्चा आहे. तसेच, या प्रकरणातील पाचही आरोपी कारागृहात आहेत.
[read_also content=”खोट्या पोलिसांनी लुटले नागपुरातील एका वृद्ध व्यक्तीचे दागिने, आरोपी सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/fake-police-looted-jewelery-of-an-elderly-man-from-nagpur-accused-jailed-on-cctv-nraa-231833.html”]