Photo Credit- X
नागपूर: नागपूरमध्ये एका धावत्या कारला अचानक आग लागल्याने (Nagpur Car Fire) रस्त्यावर एकच खळबळ उडाली. सुदैवाने, कारमध्ये बसलेल्या एका कुटुंबातील सर्व सदस्यांनी वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना नागपूरमधील जयताला रोडवरील आहे.
हरीश पांडे नावाचे गृहस्थ आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत गणेश उत्सव पाहण्यासाठी कारने जात होते. अचानक, कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला आणि विचित्र वास येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हरीश पांडे यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि कुटुंबाला बाहेर काढले. काही सेकंदातच कारने पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या.
“Another reminder to always check your vehicle’s wiring and fuel lines. Stay safe out there! 🔥🚗”
Major Car fire incident….As usual authorities reported late ..fire brigade also arrived late.#Nagpur #Bhendelayout #fire #car #Majorfire #Incident #CMO #NMC #Maharashtra pic.twitter.com/CQtLqTYNd8— Swapnil Gondule (@swapyy15) August 31, 2025
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कुटुंबातील सदस्य सुरक्षित असले तरी या अचानक घडलेल्या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. कारला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धावत्या कारला आग लागण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही कारने प्रवास करत असाल तर सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. गाडीला आग लागल्यास सर्वात आधी कोणत्याही परिस्थितीत कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
अनेकवेळा असे दिसून आले आहे की, अपघाताच्या वेळी काय करावे हे सुचत नाही आणि लोक कारच्या आतच अडकून पडतात. अशा परिस्थितीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की आग लागल्यास तुमचे पहिले काम कारमधून बाहेर पडणे हेच असले पाहिजे. आत अडकून पडल्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो अनेकांसाठी एक धडा आहे.