Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी
कमलेश मासुरकर (३४) हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांचा मुलगा रोहन (१४), दक्ष (१) आणि मुलगी सौम्या (९) समतानगरमधील घरात राहतात. शनिवारी सकाळी दक्ष आणि सौम्या शाळेत गेले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कमलेशही कामावर निघून गेले तर रोहनही शाळेला निधून गेला. दक्ष आणि सौम्या दुपारी १.१५ च्या सुमारास घरी परतले. २ वाजता सौम्या खेळायला बाहेर गेली. दक्ष एकटा टीव्ही पाहत होता.
दरम्यान, दोन दरोडेखोर मागील दाराचे कुलूप तोडून घरात शिरले. दोघांनीही तोंडावर काळे स्कार्फ बांधले होते. एक आरोपी बेडरूममध्ये घुसला तर दुसरा दक्षकडे गेला. त्याने दक्षचे तोंड दाबले आणि त्याला दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन गेला, त्याने त्याचे हातपाय शाळेच्या गणवेशाच्या टायने बांधले. त्याला आवाज येऊ नये म्हणून, त्याच्या तोंडावर स्कार्फ बांधला. त्यानंतर दुसरा आरोपी बेडरूममध्ये घुसला. कपाटाच्या लॉकची चावी शोधली, लॉकर उघडून १ लाख ०४ हजार रुपये घेऊन दोघेही पळून गेले.
पायाखालची जमीन सरकली
काही वेळातच कमलेश घरी परतले असता दक्षला खोलीत बांधून ठेवल्याचे समजले. हे पाहून त्यांच्या पायाखालवी जमीन सरकली. चौकशीदरम्यान दक्षने दोन्ही आरोपीनी बांधून ठेवल्याचे सांगितले. कमलेशने तात्काळ नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. कपीलनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही घटना आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आली नाही, पोलिस आल्यानंतरच रहिवाशांना दरोडा पडल्याचे लक्षात आले. पोलिस आजूबाजूच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासत आहेत.
Ans: नागपूरच्या समतानगर परिसरात, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: कपाटातून 1 लाख 04 हजार रुपये लुटले.
Ans: मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.






