नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (Three-member ward system) होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार २८ जानेवारीला नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार आहे. तो १ फेब्रुवारी २०२२ रोजी मनपा च्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. हा आराखडा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत (Administrative building), सिव्हिल लाईन्स आणि दहा झोनल कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे.
[read_also content=”रक्त आणण्यासाठी सलमानच्या हाती ठेवल्या जात आहेत चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या, कसा वाचविणारा चिमुकल्याचा जीव ? https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/lots-and-lots-are-being-put-in-salmans-hands-to-bring-blood-how-to-save-chimukalyas-life-nraa-230433.html”]
तर, निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास, त्या १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालयात जमा कराव्या. नागपूर महापालिकेत एकूण १५६ जागांसाठी नगरसेवक निवडणूक लढवतील. येथे महिला आरक्षणाच्या ७८ जागा, अनुसूचीत जातीच्या ३१, अनुसूचीत जातीच्या महिलांसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी १२, तर अनुसूचीत जमाती महिलांसाठी ६ जागा आरक्षित आहेत. तर, सामान्य वर्गातील महिलांसाठी एकूण ५६ जागा आरक्षित असतील.
[read_also content=”दोन महिन्यांचा पगार न देणे मालकास पडले महाग….. नोकरानेच केली चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/non-payment-of-two-months-salary-is-costly-to-the-employer-nraa-230784.html”]
न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाला सध्या वगळले आहे. राज्य निवडणूक आयोगाने २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ एवढी निर्धारित केली आहे. २०१७ च्या निवडणुकीत हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे, आता ३८ प्रभागांऐवजी ५२ प्रभाग झालेले आहेत. तसेच, नगरसेवकांच्या संख्येतही पाचने भर पडली आहे. आता नगरसेवकांची संख्या १५१ झाली आहे. २६ फेब्रुवारीला सुनावणी नंतर अंतिम आराखडा दोन मार्चला जाहीर होणार आहे. उर्वरित आराखड्याचे नेमके प्रारूप नंतरच कळणार आहे.