वाकी वुडची सहल ठरू शकते जीवघेणी, पावसाळ्यात असते मृत्यूचे सावट; तब्बल 5 पोलिस स्टेशनच्या हद्दीतून वाहत जातो मृतदेह
सावनेर तालुक्यातील वाकी येथील बाबा ताजुद्दीन दरगाहमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून प्रार्थना करतात व मनोकामना पूर्ण झाल्यावर मिरवणुकीसह बाबांच्या दरबारात पोहोचतात. या दरगाहपासून सुमारे 2 किमी अंतरावर कन्हान नदीच्या परिसरात निसर्ग सौंदर्याने नटलेला वाकी यूड हा परिसर आहे. हे प्रेमी युगुलांसाठी विशेष आकर्षणाचे ठिकाण ठरते. मात्र येथे फेरफटका मारण्यासाठी आलेल्या अनेक तरुणांना नदीत पोहण्याचा मोह अनावर होतो आणि त्यामुळे त्यांच्या प्राणांवर बेतते.
नदीत उत्तरल्यावर रेतीवर पाय ठेवल्यानंतर पाय खोल जातात, पाय उचलल्यावर रेती घसरते आणि गडद खोलपणा वाढतो. यामुळे अनेकजण भोवऱ्यात अडकून आपला जीव गमावतात. वाकी चूड हे ठिकाण बरमूडा टँगलसारख्या धोकादायक ओळखीने परिचित झाले आहे. अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. हे सर्व माहिती असूनही तरुण येथे आल्यानंतर निष्काळजीपणा करतात आणि मृत्यूच्या विळख्यात सापडतात. नंतर त्यांच्या मृतदेहाचा शोध लावला जातो तेव्हा तो लांब अंतरावर सडलेल्या अवस्थेत आढळतो आणि मृताच्या कुटुंबीयांच्या आक्रोश नदीकाठच्या मोठ्या दगडांवर आदळतो. दर अपघातानंतर काही दिवस येथे शांतता असते, मात्र नंतर पुन्हा एखाद्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडते. कितीही जनजागृती केली तरी, काही तरुण पावसाळ्यात किंवा इतर वेळी इथे पोहोचतात आणि पाण्याची खोली व रेतीच्या स्थितीबद्दल अज्ञान असल्यामुळे वाकी वुड य ‘बरमूडा ट्रगल’ च्या दलदलीत जीव गमावतात. वर्षांनुवर्षे ही मालिका तशीच सुरू आहे.
वाकी वृह कन्हान नदीत उडी मारल्यानंतर जर एखादा व्यक्ती ‘बरमुडा दंगल’ सारख्या खोल वलयात अडकून गडप झाला, तर प्रकरण खापा पोलिस ठाण्यात पोहोचते. पण जर त्याच परिसराजवळील वाघडोह किंवा डोहनघाट भागात मृत्यू झाला, तर तिथून पुढे पारशिवनी पोलिस ठाण्याची हद सुरू होते आणि बहुतेक वेळा मृतदेह पारशिवनी पोलिसांच्या हद्दीत सापडतो. जर मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत पुढे गेला, तर तो खापरखेडा, कन्हान, कामठी किवा मौदा परिसरात सुद्धा पोहोचतो. अशा वेळी पोलिसांना गोताखोरांच्या मदतीने मृतदेह शोधावे लागतात. जर चाकी वृह परिसरात प्रशासन सज्ज झाले आणि पालकांनी आपल्या मुलांना अशा पोकादायक ठिकाणी न जाण्याचा सल्ला वेळेवर दिला, तर अनेक निष्पाप जीव वाचू शकतील.
हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या कन्हान नदी परिसराचे आकर्षण अनेक तरुण प्रेमी युगुलांना व कुटुंबीयांना वाकी वूडमध्ये खेवून आणते. मात्र येथे पोहोचल्यावरच कळते की वाकी चूडमधील कन्हान नदीत अंघोळीसाठी उतरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. पोलिस प्रशासन वेळोवेळी येथे येऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असते, समजावून सांगत असते. तरीही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 31 डिसेंबर आणि नववर्ष यांसारख्या दिवशी कडक बंदोबस्त असतानाही लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यापर्यंत पोहोचतात. मौजमस्तीच्या नशेत मृत्यूचा मार्ग सहज होतो. वाकी चूड आता अश्लीलतेच्या वाढीचे आणि मृत्यूच्या तांडवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.