लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह केंद्रातील भाजपच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा वाढला आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचार सभा घेत आहेत. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, राज ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. युपीमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून महाराष्ट्रामध्ये ४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक सभा झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये असलेल्या ४८ जागांपैकी १६ जागा या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील आहेत. ७ मे ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या आहेत. तर चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उद्यापासून नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी सतत सभा घेत आहेत – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या. त्यामुळे विरोधकांकडून नरेंद्र मोदींवर अनेक टीका केल्या जात आहेत.त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. विरोधी नेत्यांना ऐकण्यासाठी लोक देखील उत्सुक नाहीत. आम्हाला आमच्या यशाचा आत्मविश्वास आहे. २००९ आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा झाल्या नाहीत तेवढ्या सभा यंदा होत आहेत. एखाद दुसरी सभा असेल. पूर्वी नरेंद्र मोदी दोन ते तीन सभा घ्याचे मात्र आता यामध्ये आता वाढ झाली आहे. आमच्या नेत्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे गर्दी होते. मग नरेंद्र मोदींना बोलावू नये का? विरोधकांकडे गर्दीही जमत नाही आणि त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही महाराष्ट्रामध्ये यंदा महायुतीच्या जागा वाढल्या आहेत असे तुम्हाला वाटत का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मला खात्री आहे की जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा १० वर्षांत रेकॉर्ड बघितल्यानंतर २०१९ मधील जागा तर आम्ही राखूच. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार त्यागले आहेत. राहिला प्रश्न पुन्हा जवळीक करण्याचा तर ते पुन्हा शक्य होणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.