नाशिक : सोमवारी नाशिकमधील (Nashik) इगतपुरी तालुक्यातील जुनवणे या गावात महाराष्ट्राला वेदना देणारी घटना घडली होती. खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे तिचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. (Nashik pregnant woman death cas) तसेच यावरुन बरेच राजकारण रंगले. याचे पडसाद विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात उमटले. सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयला मिळाली. पण आता या महिलेचा मृत्यू खराब रस्त्यामुळे किंवा गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब या कारणामुळं झाला नसून, एक वेगळ्या कारणामुळं झाल्याची महिती समोर येत आहे. (Nashik pregnant woman death case; Woman’s death due to ‘this’ reason…, what is the shocking information from the medical report)
महिलने वैदूकडे काही औषधोपचार घेतले?
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार या गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि. २७) दिली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. या महिलेचा मृतदेह गावी झोळीतूनच परत न्यावा लागल्याने या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. तसेच अनेक सामाजिक संस्था तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांनी या घटनेचा निषेध केला होता. त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
मूत्यू वैदूकडून घेतलेल्या औषधांमुळं?
जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. दरम्यान, महिलेच्या प्रसूतीची तारीख सप्टेंबर महिन्यातील होती. आरोग्य केंद्रावर केलेल्या तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल साधारण होते, अशी माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. तसेच संबंधित महिलेचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झालेला नाही. पण वैदूकडून घेतलेल्या औषधोपचारानंतर तिला उलट्या आणि प्रसूतीपूर्व झटके आल्याचे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळं या महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला, यावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.