ईडीची राज्यात छापेमारी (फाईल फोटो)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी ईडीने राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी छापेममारी केली आहे. ईडीने नाशिक, मुंबई आणि गुजरात या ठिकाणी छापेमारी केली आहे.राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमरणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पुण्याच्या खेड शिवापुर टोल नाक्यावर देखील रोकड पकडली गेली होती. त्यानंतर संजय राऊत आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात ‘व्होट जिहाद’ या शब्दाने डोके वर काढले होते. भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. निवडणुकीआधी किरीट सोमयया यांनी एक ट्वीट केले होते. त्यानंतरच ईडीने ही छापेमारी केली आहे. व्होट जिहाद प्रकरणाशी सबंधित ही कारवाई असण्याची शक्यता आहे. मालेगाव येथे दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे १२ तरुणांच्या नावाने एका बँकेच्या शकहेत बनावट अकाऊंट उघडल्याचे आरोप झाला होता.
नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या सिराज अहमदशी हे प्रकरण संबंधित आहे. व्होट जिहादसाठी १०० कोटीपेक्षा जास्त रक्कम वापरली गेली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार १२५ कोटीच्या प्रकरणात चौकशीसाठी ईडीची टीम मालेगावमध्ये दाखल झाली आहे. प्रमुख आरोपी सिराज अहमदच्या घरी ईडीकडून तपासणी सुरू आहे.
काही दिवस आधी देखील ईडीची कारवाई
आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून कारवाई केली जात आहे. त्यातच आता पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. मनी लॉड्रिंग प्रकरणात मुंबई, कर्जत, बारामती आणि पुणे येथे हे छापे टाकण्यात आले होते. ईडीने पुण्यातील एम. एस. शिव पार्वती साखर कारखान्यासह अन्य काही कंपन्यांच्या खात्यात पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून शोध मोहीम हाती घेतली आहे.
"Malegaon Vote Jihad Funding Scam" ED conducting Raids at two dozens places connected with Siraj Mohammad @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde — Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 14, 2024
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात एम. एस. हाय-टेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे व्यवस्थापक नंदकुमार तासगावकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगोले यांच्यावर बँक कर्ज फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांनी हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची मदत घेतल्याचा ईडीला संशय होता. ईडीच्या छाप्यात अनेक संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि 19.50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कंपन्यांनी 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज घेण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी 71 कोटी रुपये दिले नसल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.






