दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला (फोटो सौजन्य-ChatGPT)
Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये रोकडोबा, शिवसेवा, युवक, युनायटेड, दंडे हनुमान, महालक्ष्मी चाळ, शिवस्य जनसेवा, हिंदू एकता, भोईराज आणि नेहरू चौक मित्र मंडळ या १० मंडळांवर प्रत्येकी २ खटले दाखल होणार आहेत. याशिवाय गुलालवाडी, रविवार कारंजा, भद्रकाली, सूर्यप्रकाश, गणेश मूकबधिर, श्रीमान सत्यवादी, वेलकम सहकार्य, नवक्रांती, शैनेश्वर, गजानन, वंदे मातरम्, तरुण मित्र, गवळी वाडा, गोल्डन बॉईज, एसएनजी, सहाव्या गल्लीचा राजा आणि युवक क्रांती मित्र मंडळ या १७ मंडळांवर प्रत्येकी १ खटला न्यायालयात चालणार आहे.
बजावलेल्या नोटिसांनुसार, संबंधित मंडळांचे अध्यक्ष, जबाबदार पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटर यांना पोलिसांसमोर हजर राहून आपले लेखी व तोंडी म्हणणे मांडावे लागणार आहे. मात्र, पोलिसांनी ध्वनी तीव्रतेचे डिजिटल पुरावे आधीच गोळा केल्याने, पदाधिकाऱ्यानी काहीही स्पष्टीकरण दिले तरी त्यांना न्यायालयात थेट खटल्याला सामोरे जावेच लागणार आहे. या खटल्यामुळे आता पदाधिकाऱ्याऱ्यांना न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील, तसेच कायदेशीर शिक्षेची टांगती तलवार राहणार असल्याने मंडळ कार्यकत्यांचे धाबे दणाणले आहेत.
रविवारी (दि. २७) जुने नाशिक भागात काढण्यात आलेल्या ‘जुलूस-ए-गौसिया’ मिरवणुकीतही ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. गणेश मंडळांप्रमाणेच या मिरवणुकीच्या आयोजकांनाही न्यायालयात खेचले जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार न्यायालयाकडून कठोर शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास संबंधित मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे चालकांना ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
वणीत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचा धडाका; अनधिकृत बांधकामांवर कारवाई






