रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी
अरविंद जाधव, नाशिक : नाशिक गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदून (Nashik Pothole Deaths) ठेवले आहेत. उन्हाळ्यात रस्त्यांची अपेक्षित डागडूजी किंवा नवीन कामे न करता, महापालिका प्रशासन आणि सरकारने एकाच वेळी सर्व कामे हातात घेतल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नाशिककरांना रस्त्यांवरून चालताना जीवघेणी कसरत करावी लागत असून, गेल्या चार महिन्यांत वेगवेगळ्या अपघातांत खड्यांमुळे तब्बल पाच निष्पाप नागरिकांचा बाद गेला आहे. या दुर्दैवी मृतांमध्ये निलेश कोतकर, प्रभाकर निकम, दिपाली बेळे आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे. याशिवाय सातपूर भागातील एक्लो पॉइंट रस्त्यावरही खड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती आहे. खड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापुरतेच हे नागरिक थांबणार नसून, आता प्रशासनाविरोधात थेट कायदेशीर लढा पुकारण्यात येणार आहे. खड्यांमुळे झालेल्या सर्व अपघाती मृत्यूंची सखोल माहिती गोळा केली जात आहे. या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल वेट महापौर, महापालिका आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अॅड. गिते यांनी जाहीर केले आहे. या कायदेशीर आणि रस्त्यावरील लढ्यामुळे नाशिकमधील रस्ते विकास आणि भ्रष्ट कारभाराचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.
चालू पावसाळ्यात रस्त्यांची कामे पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, या भीषण रस्त्यांचा मोठा आर्थिक फटका नाशिकच्या व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाला जागे करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेडा न घेता, सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने ‘खड्डयांची वारी’ हे जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. अजिक्य गिते यांनी केली आहे. ठिकठिकाणी तीव्र निदर्शन केल्यानंतर हे आंदोलन थेट महानगरपालिकेवर धडकणार आहे. पुढील दोन दिवसांतच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे गिते यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पडलेल्या खड्कुच्चांमुळे आतापर्यंत ५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. एक्स्लो पॉईंट चौकात खड्चामुळे दुचाकी घसरून निलेश प्रल्हाद कोतकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या खड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्यापासून शहरातील चौकाचौकात तीव्र जनआंदोलन छेडणार आहे.






