ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार? (फोटो सौजन्य-X)
Nashik West Assembly Election results 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाण EVM मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे मतदान झाले आहे, असा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवानंतर सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली होती.ती मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे. महायुतीच्या भाजप उमेदवार सीमा हिरे यांनी 1 लाख 41 हजार 725 मते मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधली. येथे आमदार हिरे या १५ उमेदवारांपैकी एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांनी उर्वरित १४ उमेदवारांना पराभूत केल्याने ‘एक नारी, सबपे भारी’ असा नारा देत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
“विरोधी पक्षनेता नसलेल्यांनी आमच्याबाबत बोलू नये…”; उदय सामंतांनी महाविकास आघाडीला फटकारले
त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा 68 हजार 177 मतांनी पराभव झाला. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली. मनसेचे दिनकर पाटील ४६ हजार ६४९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघात मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे. यानुसार बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण दोन लाख ७४ हजार २०८ मतदान झाले होते. यामध्ये १ लाख ४७ हजार ३८२ पुरुष आणि १ लाख २६ हजार ८२३ महिलांसह तीन तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. दोन हजार ३१३ मतदारांनी टपाली मतदान केले होता. एकंदरित या मतदारसंघात ठाकरेंची पुन्हा मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘युज ॲन्ड थ्रो’ ही भाजपची पॉलिसी, ते शब्द पाळत नाहीत…; मुख्यमंत्रिपदावरुन संजय राऊतांचा घणाघात