मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धारावर ठाम होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनीही राणा दाम्पत्याला मातोश्रीबाहेर येऊन दाखवण्याचं आव्हानच दिलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग ओलांडून थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीच्या खाली धडकले. यामुळे मुंबईतील एकूणच परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली.
दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या (PM Narendra Modi Mumbai Visit) दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा इरादा आहे. पण त्यामुळे मी माझं आंदोलन मागे घेत आहे, असं आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं.
आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा पठण करण्याची मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. राज्यावर आलेलं संकट, शेतकऱ्यांवर आलेलं संकट, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर अनेक संकट आली आहेत. तेव्हापासून राज्यातील जनता त्रस्त आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा आमच्या ह्रदयात आहेत. मातोश्री आमच्या ह्रदयात आहे. मी कुठलंही चुकीचं भाष्य केलं नाही.
[read_also content=”छातीत वारंवार दुखणे, अस्वस्थता किंवा चक्कर येणे; हे केवळ हृदयविकारच नाही, तर ‘या’ आजाराचे असू शकते लक्षण https://www.navarashtra.com/lifestyle/cardiophobia-chest-pain-and-dizziness-is-not-just-heartattack-can-be-reason-of-this-disease-nrak-272301/”]
आज आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जात होतो पण पोलिसांनी आम्हाला रोखलं. आम्हाला घरात डिटेन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना पाठवून आमच्या घरावर हल्ला केला. असं वातावरण तयार केलं की, कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा आदेश या शिवसैनिकांना आहे. जर मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे. महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेने होत आहे.
उद्या देशाचे पंतप्रधान मुंबईत येत आहे. एक आमदार आणि खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की, जर पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तीमत्व आपल्या राज्यात येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागता कामा नाही. वेळेत वेळ काढून जर मोदी मुंबईत येत आहेत तर मुंबईसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कुठलंही विघ्न नको म्हणून आपण आंदोलन मागे घेत असल्याचं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं आहे.