'या' ठिकाणांच्या निवडणुकीसाठी महायुती एकजूट झाली
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी बहुतांश नगरपालिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये स्वबळाचा वापर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विशेषतः महायुतीमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे. शिर्डी, राहाता आणि संगमनेर या काही अपवादांव्यतिरिक्त महायुतीतील अंतर्गत डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपली. शेवटच्या दिवशी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. छाननी प्रक्रियेत आक्षेप, त्यावरील युक्तिवाद आणि कागदपत्रांची वाढती विनिमय प्रक्रिया यामुळे अनेक ठिकाणी छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली.
Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर
सुरुवातीला जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळसरळ लढत दिसेल, अशी अपेक्षा होती. परंतु दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात फोडाफोड झाली असून महायुतीतील स्थिती अधिक गंभीर आहे. महायुतीत घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने भाजपाची अडचण वाढली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी, संगमनेर आणि राहाता येथे महायुती कायम राहील असे आधीच संकेत दिले होते, ते खरे ठरले. मात्र इतरत्र परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे.
कोपरगावमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्र लढत असल्याचे निश्चित होते. त्यात भाजपामध्ये बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने देखील स्वतंत्र उमेदवार दिला आहे. मविआत मात्र उभाठाचा एकच उमेदवार आहे.
येथे भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. मविआमध्ये उभाठा आणि काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहेत.
नेवासा येथे महायुती विरुद्ध क्रांतिकारी शेतकरी पक्ष अशी लढत आहे. मविआचे अधिकृत अस्तित्व नसले तरी महायुतीतील नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळाल्यानंतर भाजपामध्ये नाराजी असून शिवसेनेचेही काही कार्यकर्ते स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत.
पाथर्डीत महायुतीतच फूट पडली असून नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या विरोधात अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. येथे मविआमध्येही काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाठा स्वतंत्र लढत आहेत.
श्रीगोंद्यात सर्वच पक्ष स्वतंत्र मैदानात आहेत—भाजपा, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरत आहेत. मविआकडून एकत्र उमेदवार असला तरी उभाठाने स्वतंत्र उमेदवार देऊन स्पर्धा अधिक चुरशीची केली आहे.
येथे महायुती आणि मविआ—दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहे.
येथेही महायुतीत भेग पडली असून भाजपा आणि शिंदे शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरले आहेत.






