फोटो सौजन्य: iStock
जागतिक सायबरसुरक्षा प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने भारतातील वापरकर्त्यांसाठी नवीन Quick Heal Total Security Version 26 चे औपचारिक लाँच केले आहे. कंपनीने जगभरातील ग्राहकांच्या डिजिटल सुरक्षेची 30 वर्षे पूर्ण करताना प्रगत AI सुरक्षा, गोपनीयता संरक्षण, आणि रिअल-टाइम फसवणूक प्रतिबंध एकत्र करणारे हे नवे व्हर्जन बाजारात आणले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, भारतात डिजिटल गोपनीयतेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे लाँच महत्त्वाचे ठरत आहे. सध्या 85% भारतीयांचा वैयक्तिक डेटा ऑनलाइन लीक झाला आहे, तर सायबर गुन्हेगार प्रति मिनिट 1.5 लाख रुपये नुकसान करत असल्याचे समोर आले आहे.
क्विक हीलचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर यांनी सांगितले की, “Version 26 हे सायबरसुरक्षेच्या भविष्याचा मोठा टप्पा आहे. आजच्या धोक्यांसाठी पारंपारिक अँटिव्हायरसपेक्षा जास्त स्मार्ट, एआय-सक्षम आणि गोपनीयता-केंद्रित सोल्यूशन्सची गरज आहे.”
1) SIA – Security Intelligent Assistant
हे एआय-चालित सहाय्यक वापरकर्त्यांना साध्या भाषेत सुरक्षा सूचना देतो. जटिल शब्दजाल टाळत स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन करून सायबरसुरक्षा सर्वांसाठी सुलभ करतो.
2) GoDeep.AI – भविष्यासूचक धोक्यांची ओळख
हे तंत्रज्ञान लाखो धोक्यांचे विश्लेषण करून संभाव्य हल्ले आधीच थांबवते. प्रोग्रामच्या वर्तनावर नजर ठेवून संशयास्पद कृती त्वरित ब्लॉक करते.
3) डार्क वेब मॉनिटरिंग 2.0
अपडेटेड सिस्टम वापरकर्त्याच्या ईमेल आयडी व इतर संवेदनशील माहितीसाठी डार्क वेबवर सतत तपास ठेवते. कोणतीही माहिती लीक झाल्यास तत्काळ अलर्ट मिळतो.
4) AntiFraud.AI – डिजिटल फसवणूक रोखणारे नवे तंत्रज्ञान
हे सिस्टम फसवे अॅप्स, वेबसाइट्स, स्कॅम कॉल्स, फ्रॉड युपीआय रिक्वेस्ट्स व फिशिंग लिंक्स ओळखून त्यांना ब्लॉक करते.
KYC-सत्यापित डेटा वापरून अधिक अचूक संरक्षण पुरवते.
Version 26 मधील नवी टूल्स वापरण्यास सोपी असून भारतातील ग्राहक, कुटुंबे आणि व्यवसायांसाठी डिजिटल सुरक्षितता अधिक मजबूत आणि सुलभ करण्याचा दावा कंपनीने केला आहे.






