अजित पवार PM नरेंद्र मोदींच्या सभेला गैरहजर राहणार; मोठं कारण आलं समोर
नरेंद्र मोदींची आज मुंबईत सभा होत आहे. या सभेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवार या सभेला जाणार नसल्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता या सभेला उपस्थित राहणार नाही. बटेंगे तो कटेंगे हा भाजपने दिलेला नारा अजित पवारांना मान्य नसल्याचंही बोललं जात आहे.
हेही वाचा-श्रीलंकेत संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू; राष्ट्रपतींच्या पक्षाला बहुमत मिळण्याची अपेक्षा
विधानसभा निवडणुक प्रचारात नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या नेत्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. त्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रा अशा कोणत्याच गोष्टी होणार नाहीत. फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांच्या विचारांनी हे राज्य चालतं. बटेंगे तो कटेंगे हा नारा उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये चालत असेल, महाराष्ट्रात नाही, असा टोलाही त्यांनी योगी आदित्य नाथ यांना लगावला होता. आम्ही या विधानाचं कधीही समर्थन करणार नाही. सबका साथ सबका विकास हा आमचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान आज मुंबईत दादर शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होत आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे नियोजित कार्यक्रमामुळे सभेला येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अजित पवार या सभेला उपस्थित राहणार नसल्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा-“राजकीय नेत्यांची संपत्ती पाच वर्षात वाढते तर सामान्य माणसाची का नाही”? , नागरिकांना संतप्त सवाल
नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या ज्या ज्या मतदारसंघांमध्ये सभा होतायेत तिथे मतदान कमी होत चाललं आहे. महायुतीच्या मंचावर गेल्यामुळे आपलं नुकसान होत असल्याची जाणिव अजित पवारांनाही झाली असेल, त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभेला जाणं टाळलं असावं असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहा अशा बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे. मात्र प्रचार सभांमध्ये योगी आदित्य नाथ आणि मोदींनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचाराने चालतो. ज्या एकता आणि सद्भावना आहे. त्यामुळे बाकीच्या राज्यांशी महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही. बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन अशी विधान करत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला या अशा गोष्टी आवडत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ते आज मोदींच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.