सभापतींच्या खुर्चीवर सुनेत्रा पवार अन् समोर त्यांच्याच पक्षाचे खासदार; वेळेवरून प्रफुल पटेलांना सुनावलं
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यसभेतही त्यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आज त्या सभापतींच्या खुर्चीवर होत्या आणि समोर त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रफुल पटेल होते. पटेल भाषण करत असताना सुनेत्रा पवार यांनी त्यांना वेळेच्या मर्यादेची आठवण करून दिली. त्यावर त्यांनी आमच्याकडे वेळच वेळ आहे, भाजपकडून मला मिळाला आहे, असं उत्तर दिलं, त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे.
Anjali Damania on Devendra Fadanvis: हीच देवेंद्र फडणवीसांची रणनीती…; अंजली दमानियांचा गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा खासदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्या सध्या राजधानी दिल्लीत आहेत. राज्यसभेच्या तालिका सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत आज (10 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून तालिका सभापती म्हणजेच पीठासीन सभापतीपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे पीठासीन सभापती सुनेत्रा पवार असताना केंद्रीय अर्थसंकल्पावर त्यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खासदार भाषण करत होते, तर भाजपकडून डॉ. भागवत कराड हे भाषण करत होते. खासदार प्रफुल्ल पटेल भाषण करत असताना राज्यसभेत पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवार आणि राज्यसभा सदस्य म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या जुगलबंदी पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना तुमचा वेळ संपला आहे, असं सांगून भाषण थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर, विरोधी बाकीवरील खासदारांनी देखील वेळ संपल्याची आठवण करून दिली.
Eknath Shinde News: मतभेद मनभेदात बदलले; एकनाथ शिंदेंना नेमकं झालंय काय?
सुनेत्रा पवारांच्या या सूचनेनंतर, मला भाजपकडून वेळ मिळाला आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. इकडे वेळ आहे (भाजपकडे हात करून ) यांच्याकडे वेळच वेळ आहे, तुमचा वेळ संपला आहे, असा टोला विरोधकांना लगावला. मात्र, त्यानंतरही सुनेत्रा पवार यांनी तुमचा वेळ संपला आहे, असा पुनर्उल्लेख करता प्रफुल्ल पटेल यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर, खासदार पटेल यांनी हात जोडून चर्चेला पूर्णविराम दिला. अजित पवार गटाचे राज्यसभेत सध्या दोनच खासदार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला होता. सुनिल तटकरे सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत.