NCP Politics: Amol Mitkari, Rupali Thombre Patil removed from NCP spokesperson post
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून स्वत:च्याच पक्षाची कोंडी केल्या प्रकरणी या दोघांवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमवरून महायुतीत सातत्याने वाद निर्माण होत होता. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी टिका केल्याने त्यांनाही याचा फटका बसल्याची चर्चा आहे.
Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज
फलटणमधील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टिका केली होती. त्यामुळे ठोंबरे पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांची भेट घेऊन काही तास उलटत नाहीत तोच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यासोबतच वैशाली नागावडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या वादानंतर काही महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा देणारे सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची या निर्णयावर काय प्रतिक्रिया असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार? संजय जगताप यांना करावी लागणार
फलटण जिल्हा रुग्णालय डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात चाकणकर यांनी संबंधित तरुणीचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या वक्तव्यानंतर पक्षातील दोन महिला नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता.
या वादाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. पक्षाचे संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलेल्या या नोटीसमध्ये, “आपण पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या असूनही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला अध्यक्षा यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे पक्षशिस्तभंगाचे आहे,” असे नमूद करण्यात आले होते. तसेच सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने पक्षाने आज रुपाली पाटील-ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
सना मलिक
अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे






