मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेला आहे, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं राज्यात वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळं यावर बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून, फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत, अशी टिका विरोधकांनी केली होती. तसेच वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प राज्याबाहेर गेला हे उद्योगमंत्री उदय सामंत यांना माहितच नव्हते, असा आरोप सामंत यांच्यावर केला जातोय. दरम्यान, आज उद्यागोमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत, वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टिका केली आहे.
[read_also content=”सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्राची आठवण झाली, खासदार सुजय विखे-पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/after-losing-power-then-maharashtra-was-remembered-mp-sujay-vikhe-patil-criticized-uddhav-tackeray-339694.html”]
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प राज्यात आणण्यास मविआची मानसिकता नव्हती, हा प्रकल्प बाहेर जाण्यास मविआ जबाबदार आहे. गेलेला प्रकल्प पुन्हा राज्यात आणून दाखवणार, त्यामुळं आमच्या सत्काराची तयारी करा असा टोला देखील सामंत यांनी विरोधकांना लगावला. वेदांता प्रकल्पाबाबत विरोधक आमच्यावर खापर फोडत आहेत. पण हा प्रकल्प आमच्या सरकारमध्ये गेला नाही, मविआच्याच सरकारमध्ये गेला आहे. पण आगामी काळात राज्यात मोठे प्रकल्प आणू, अशी ग्वाही उद्यागोमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली.