बकरी ईदबाबत काय म्हणाले नितेश राणे? (फोटो- सोशल मिडिया)
नागपूर: राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे हे आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विषयावर देखील भाष्य केले आहे. तसेच बकरी ईद, सुधाकर बडगुजर आणि आदित्य ठाकरे, मासेमारी अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे. नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचा सल्ला दिला आहे.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने आपली भूमिका जबाबदारीने निभावली पाहिजे असे मला वाटते. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता त्यांचे प्रबोधन कसा करू शकता, यावर भूमिका मांडली पाहिजे. सध्या त्यांची जी भूमिका आहे ती ती इस्लामला बदनाम करणारी आहे.”
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “जेव्हा हिंदू समाजाला इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी साजरे करण्याचे सल्ले दिले जातात. तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा अशी माझी भूमिका व सल्ला आहे. जसं हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचा ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही, मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.
Sudhakar Badgujar: “… तर मी हा गुन्हा केलाय? हकालपट्टी होताच बडगुजर उद्धव ठाकरेंवर कडाडले
सुधाकर बडगुजरांवर काय म्हणाले नितेश राणे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुधाकर बडगुजर यांनी भेट घेतली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार कि नाही याबाबतचा अधिकृत निर्णय झाला आहे याबाबत काही माहिती नाही. ते जो कोणता निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली आहे असे मी ऐकले आहे. जेव्हा निर्णय होईल तेव्हा बोलणे योग्य होईल.
हकालपट्टी होताच बडगुजर उद्धव ठाकरेंवर कडाडले
ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी कैवल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षामध्ये नाराज असल्यावर ती नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असल्यास तो मी केला आहे. त्या गुन्ह्याच्या शिक्षेचे रूपांतर हकालपट्टीमध्ये झाले तर त्यावर मी काय उत्तर देणार? मी पक्षाविरुद्ध कोणतेही वक्तव्य केलेले संघटनात्मक बदल झाले त्यावर मी भाष्य केले. नाराजी व्यक्त करणे याची शिक्षा गुन्हा असेल तर मी केला आहे.”