निरंजन डावखरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल-नितेश राणे
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन वसंत डावखरे हे उभे आहेत. ते कोकणच्या विकासासाठी लढले आणि कोकणासाठी त्यांनी मोठा निधी आणला आहे. त्यामुळे ही पूर्ण निवडणूक एकतर्फी आहे. विरोधी नेते आहेत त्यांचा कुठेही प्रचार आम्हाला दिसत नाही. महाविकास आघाडीचे नेते आम्हाला सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीत प्रचार करायला आलेले दिसले नाहीत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील प्रांत कार्यालयात कोकण पदवीधर मतदार निवडणूकीसाठी मतदान केल्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सिंधुदुर्ग – रत्नागिरी पर्यंत जे उमेदवार येवू शकत नाहीत ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकण , रत्नागिरी, रायगड आणि पूर्ण भागाचा विकास करु शकतात का ? त्यामुळे मी म्हणतो की मतदान हे पूर्णपणे एकतर्फी आहे. कारण प्रत्येक पदवीधरांपर्यंत पोहोचण्याचे काम आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मतदारांकडे फिरकलेले नाहीत. त्यांचे नेतेही फिरकले नाहीत. जे निवडणूकीच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत ते निवडणूकीनंतर काय पोहचणार? असा सवाल नितेश राणेंनी यावेळी उपस्थित केला.
महायुतीसाठी विजयी घौडदौड सुरु ठेवणारी ही निवडणूक आहे. जिथे जिथे पदवीधरांची निवडणूक आहे. तिथे मी स्वत: फिरलेलो आहे. नाशिक सोडून सर्व ठिकाणी महायुतीच्या बाजुने वातावरण आहे. मुंबई पदवीधर मधुन किरण शेलार उभे आहेत. शिक्षक उमेदवार पण उभे आहेत. महायुतीचेच वातावरण या पुर्ण राज्यात आहे. देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर मग महायुती शिवाय दुसरा पर्यायच नाही. उबाठा , कॉग्रेस , शरद पवार गट असेल तर हे कुठेही सत्तेत नसलेले पक्ष आहेत. पदवीधरांना न्याय कसा देणार ? म्हणूनच कोकणातील पदवीधर निवडणूक ही एकतर्फी आहे. निवडणूक मानसिक दृष्ट्या महाविकास आघाडीचे उमेदवार हरलेले आहेत. म्हणूनच मतदारांकडे फिरकलेले नाहीत. म्हणून उबाठा , शरद पवार गटांचे मतदार त्यांचेच कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात का आणत होते असा प्रश्न आ. नितेश राणेंनी केला.
कोकण पदवीधर मतदार संघ आहे. याठिकाणी मनसेनेचा पूर्णपणे पाठींबा आम्हाला आहे. अभिजित पानसे आणि राज ठाकरे यांनीही पाठींबा दिला आहे.असेही ते म्हणाले. तसेच कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महायुतीच्या बुथवर भाजपा आ. नितेश राणे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत , माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री , राजु पेडणेकर , कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर , किशोर राणे , सुशील पारकर , बंडु हर्णे , कळसुली सरपंच सचिन पारधिये , सादिक कुडाळकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.