Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार, एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती; प्रकल्प लवकर सुरु होतील- मुख्यमंत्री 

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक (economic conference) करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 18, 2023 | 02:21 PM
दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार, एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती; प्रकल्प लवकर सुरु होतील- मुख्यमंत्री 
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस (davos) इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक (economic conference) करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो.

[read_also content=”तारीख पे तारीख! महापालिका निवडणुका अद्यापही अधांतरीच, सुप्रीम कोर्टात आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी https://www.navarashtra.com/maharashtra/municipal-elections-are-still-pending-hearing-in-the-supreme-court-now-in-the-first-week-of-february-362661.html”]

हायटेक, पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत (economic conference) दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी

ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी

माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी विश्वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण

राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नविन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

सामंजस्य करारांची एकत्रित माहिती

पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूक
पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक
औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार)
चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार)
चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)
गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)
महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार)
महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक
महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार)
लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार)
हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार)
नुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )

नॉलेज पार्टनरशिपसाठी करार
दावोस येथे महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी देखील खालील सामंजस्य करार करण्यात आले.
मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी साठी सामंजस्य करार
स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार

मोदींचे मुंबईत स्वागत…

दरम्यान, उद्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या लोकापर्ण सोहळ्यासाठी येत आहेत, त्यांचे मुंबईत स्वागत आहे. दोवासमध्ये देखील मोदींचे आकर्षण तिथल्या लोकांना आहे. मोदी हे जगात प्रसिद्ध आहेत, मुंबईकरांच्या विकासात आणखी भर पडत आहे. त्यामुळं मोदींचे मुंबईत विविध ठिकाणी बॅनर लागले आहेत. मुंबईकर त्यांच जोरात स्वागत करतील असं मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतर आज म्हणाले.

Web Title: One lakh thirty seven thousand crore investment mou creation of more than one lakh jobs in davos world economic conference projects will start soon cm information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 02:17 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray
  • जयंत पाटील Bhagat singh Koshyari

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
2

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.