मुंबई : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. त्यात आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे राज्यातील काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. त्यामध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असे त्यांनी सांगितले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर हटवले जातात ही चिंतेची बाब – जयंतराव पाटील
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी… pic.twitter.com/0Z35rloilC
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 29, 2023
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब : जयंत पाटील
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.