Pandharpur News: सारीका साबळेंच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालकेंंच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा
माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार.सारिका साबळे यांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारी मतांची विभागणीही टळलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट आणि डॉ. प्रणिता भालके यांच्यामध्ये लढतीची रंगत पहावयास मिळणार आहे.
Nashik News: महापालिकेची मतदार यादी जाहीर; पुरूष सात तर साडेसहा लाख महिलांचा
यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी कामे करणार आहे. असे डॉ. प्रणिता ताई भालके यावेळी त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पुढे पंढरपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले म्हणाले डॉ.प्रणिता भालके यांना सर्वतोपरी सहकार्य करून निवडून आणण्याचा आम्ही अथक पणे प्रयत्न करणार आहोत. असे नागेश काका भोसले आणि आपल्या मनोगतामध्ये आपले मत व्यक्त केले.
आता बिबट्यांची खैर नाही! Forest Department ॲक्शन मोडमध्ये; ३० ट्रॅप अन्
पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील एक मान्यवर उमेदवार सारिका साबळे यांनी माघार घेतल्यामुळे साबळे यांच्या मतांचा लाभ डॉ प्रणिता ताई भालके यांना होणार आहे. त्यामुळे प्रणिता भालके यांचा यशाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.






